नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 29, 2022

तिचा हक्क

तिचा हक्क तिला द्यायलाच हवा ..
पणती तूनही प्रकाश घ्यायला हवा नवा ..

तिच्या अस्त्वित्वा पलीकडेही तिची ओळख व्हावी ..
स्त्री जन्माची कहाणी नव्याने उलगडावी ..


अत्याचाराला वाचा तिनेच फोडायला हवी ..

शिवबा सारखा पुत्र ह्या स्वराज्यास द्यायला ,
तिनेच जिजाऊची ओवी रचायला हवी ..

चार भिंतीत राहूनही  तिला ,
जगाची ओळख व्हायला हवी ..
तरच ती कहाणी रचू शकेल नवी ..

तिनेही बघायला हवी स्वप्न ..
स्वप्न बघताना ती पूर्ण करण्याची ,
आस ही मनी ठेवावी ..


चार चौघात ती आदर्श स्त्री म्हणून झळकावी ..

तिचा हक्क तिला समाजाने द्यायलाच हवा ..
समाजाने देण्याआधी तिच्या कुटुंबाने तिला .
जगण्याचा विश्वास आणि सामर्थ्य द्यायला हवे ..
ते घडवेल तिचे भवितव्य उज्वल नवे ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...