तू स्वप्न परी ..
अवतरली माझ्या घरी ..
चंद्रमुखी माझी साजरी ..
लाजरी गोजरी ..
कोजागिरीच्या राती धम्माल केली ..
काळजाची तार तू छेडली ..
त्या नभात जाऊन दडली ..
माझ्यावर खुदकन हसली ..
दुधात चंद्र तुझ्या भेटीला आला ..
आम्हाला कोणालाही नाही दिसला ..
तो फक्त तुझ्यासाठी त्या दुधावर तरंगला ..
तुझ्याशी च एकरूप झाला ..
तू लेक माझी लाडकी ..
त्याची ही लाडकी झाली ..
तुझी आणि त्याची मैत्री छानचं रंगली ..
मला बाबा खूपच आवडली ..
व्वा मस्तच 👌
ReplyDeleteखूप छान अप्रतिम 👌
आबा
🙏