आई पण हे काय असतं . हे आपण आई होणार ह्याची चाऊल लागताच समजतं . खरचं आयुष्याचं खरं समीकरण तेव्हा उलगडत ..
एक नवा जीव आपल्या कोवळ्या गर्भात वाढवण. वाटतं तेवढं सोपं नसतं . आणि त्याच्या एवढा आनंद दुसऱ्या कशातच नसतो.
आई बाबा होणं जगातील सर्वात मोठं सुख. पुन्हा एकदा आपल्याला आपलं बालपण आठवता येतं . आणि अनुभवता येतं.
आई बाळ जन्माला येण्याआधी त्याच्याशी एकरूप होते . त्याच्याशी गप्पा मारते. त्याच्याशी छान मैत्री करते .
त्याच्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करते.
काही ही खाण्याआधी त्याचा विचार करते ..
" माझ्या बाळाला हे चालेल ना , expect करेल ना तो हे .. ह्याच्यामुळे त्याला काही त्रास तर नाही , होणार ना ?"
असे कितीतरी प्रश्न तिच्या मनात सतत रेंगाळत असतात . शेवटी आईच ती तिची सर कोणालाच येणार नाही .
तिच्या एवढी माया लावणं ह्या जगात दुसऱ्या कोणाला जमणार नाही . आणि तिच्या साथीला असतात . ते बाळाचे बाबा ते ही तिच्या आईवर आणि त्याच्या बाळावर बाळं जन्माला येण्याआधी खूप प्रेम करत असतात.
खरचं आई - बाबा होणं जगातील सर्वात मोठं सुख , देवबाप्पा ने ते प्रत्येकाच्या वाट्याला द्यायला हवं. तरच प्रत्येक बाई ही आई पण अनुभवू शकेन आणि प्रत्येक पुरुष हा बाप होण्यात काय आनंद असतो . ह्याचा आनंद घेऊ शकेल .
Written by - durga mate
खूप छान अप्रतिम लिहिलंय 👌
ReplyDeleteसौभाग्य माता होण्याचं 👌
आबा
🙏
Thanks
Deleteआई होण्याचं सुख छान अनुभव कर . स्वर्गीय आनंद असतो तो . मस्त लिहिलय .
ReplyDelete