तुझी माझी रेशीमगाठ अशीच राहू दे ...
नात्याची वीण ही गठ्ठ होऊ दे ..
तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य निरंतर तेवत राहू दे ..
जन्मो जन्मी ,
तुझ्याच नावाचं कुंकू माझ्या भाळी लाभू दे ..
किती ही येऊ दे सुख - दुःख तू साथ नको सोडूस .
मी किती ही चिडले तुझ्यावर , तू राग नको धरुस.
पाऊले सोबत चालताना , मागे वळून नको पाहुस ..
किती ही भांडले तुझ्याशी तरी , ही सोडून नको जाऊस .
तुझ माझं हे प्रेम असच राहू दे ...
हसत - खेळतं आणि फुलत ..
पदोपदी उलगडणार कोडं ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.