एकाकी जीवनात माझ्या तू आला ...
आयुष्याला साज नवा चढला
जरी लाभले आयुष्याला जबाबदारीचे कुंपण. .
तरी ही सजले आनंदाने अंगण...
अनोळखी तुझ्या भेटीत सुर नवे शोधले ..
तुझ्या नावीच श्वास माझे अर्पण करावे आज वाटले ..
तू टाकलंस माझ्या आयुष्यात पहिलं पाऊल ..
प्रेमाची आणि सुखाची लागली चाऊलं ..
उघड्या माझ्या आयुष्यात प्रेमाचे पांघरूण तू घातले ..
जणू माझ्या सुखासाठीचं देवाने तुला माझ्याशी बांधले.
Written by - durga mate
अप्रतिम सुंदर रचना
ReplyDelete