आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ...
सैर करावी हसत्या शिखरावर ..
राग न धरावा आपल्या माणसांवर ..
प्रेम करावे ह्या जगण्यावर ...
अडगळीतील दुःख सारे विसरून जावे ..
सुरेल मैफिलीतील सुख वेचीत चालावे ..
राग द्वेष विसरून सारे जीवन जगावे ..
समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे कारण व्हावे .
गोड शब्दांनी चार माणसं जोडावी ..
वीण ही जन्मोजन्मी स्मरणात ठेवावी ..
हसत खेळत आयुष्याची संध्याकाळ सुरेल व्हावी ..
त्याला ना दृष्ट कुणाची लागावी ..
राग - द्वेष - क्रोध - लोभ ह्याची सावली न तेथे पडावी ..
आयुष्याची संध्याकाळ रंगीत व्हावी ..
Written by - durga mate
अप्रतिम सुंदर रचना
ReplyDelete