धुके हे विरत जावे ,
पहाटेचे स्वप्न आता सरत जावे ,
तुझे माझे बंध हे नव्याने जुळावे ,
क्षण भराचे नाही तर आयुष्य भराचे ...
खूप झाले विरहाचे भोग ,
आता तरी माझे मन बघ ,
चूक केलेली विसर एक क्षण ,
प्रेम केलेले आठव मन भर ,
बंध हे रेशमाचे जुळूदे ,
एक मेकांच्या ओठी नाव हे ,
तुझे माझे गुण गुनु दे ,
स्वप्न सत्यात उतरण्याचे स्वप्न आज ,
मला पाहू दे ...
बंध हे जुळावे ,
आकाशात चांदण्यासंगे ,
तुझे माझे नाव रेखावे
बंध हे जुळावे ...
अप्रतिम रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर 👌👌
ReplyDeleteवाहहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteछानच लिहीलयस ✍✍👌👌👌👌👌
ReplyDelete