नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 30, 2021

हरवली पाखरे

वंदन माझे सरस्वती मातेला ,


ज्ञानदेवतेला ...


ह्या पाखरांना तिने कुशीत घेतले ,


ज्ञानाचे दिप ओंजळीत  टाकले ...


किलबिलत्या मनाला आकार दिला ,


ज्ञानाचा झरा इथे ओसंडू लागला ,


सकाळ सकाळी रविकिरणाला ही अभिमान वाटला ,


ज्ञानदीप त्याच्या नयनात दाटला ...


वृक्ष वेली पशू पाखरे ,


घेर घालू लागले ज्ञान दिपाला ,


आशिष देऊ लागले ,


ज्ञान दिपात शिकत असलेल्या प्रत्येक पाखराला


अभिमानाप्रती माया साठली ,


ज्ञानदीपातील पाखरांसाठी ,


कोकिळा ही गाऊ लागली ...


आनंदाची जीवन गाणी ...


सकाळ सकाळी ज्ञानदीप उजळून  निघत . पाखरांचा किलबिलाट , पशू पक्षांचा थवा , फुलांचा मनमोहक  सुगंध, वाऱ्याची अलगद येणारी झुळूक आणि त्यात मनाला प्रसन्न करणारी हवा . 


दिवाळीचा सण तोंडावर आला होता . मुलांना परीक्षेची ओढ लागली होती . कधी एकदा परीक्षा संपते आणि दिवाळीची सुट्टी मिळते . असं झालं होतं .  रोज मिळणारा अभ्यास त्यांना समाधान द्यायचा . ज्ञानदीप आणि ज्ञानदिपातील पाखरं ह्यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध खूप छान जुळले होते .


ज्ञानदीप मुलांचा जीव की प्राण होता .   ज्ञानदीप मुलांच भवितव्य उज्वल करण्यास मदत करत होता . मुलांना अप्रत्यक्षरित्या सक्षम करत होता ....


ज्ञानदिपाचे खूप उपकार होते मुलांवर आणि मुलांचे ही ज्ञानदिपावर .... त्यांच्यातील boinding खूपच छान होत .


पण अचानक त्यांच्या नात्याला त्या ज्ञानदिपाला दृष्ट लागते .  ते ज्ञानदीप बिल्डर्सच्या डोळ्यावर येतं . ज्ञानदिपाच्या ठिकाणी मोठा मॉल आणि मार्केट बनवायचं असे ते ठरवतात . आणि त्या अनुषंगाने अथक प्रयत्न करत राहतात . ज्ञानदिपावर मुलांचा जडलेला जीव त्या बिल्डर्सच्या अथक प्रयत्नांना मोडून काढत होते .


वारंवार येणाऱ्या अपयशाने बिल्डर्स हताश झाले होते . शेवटी ते एक खूप मोठा आणि हृदय हिन निर्णय घेतात . जो ज्ञानदिपातील पाखरांना कायमचे उडवून लावतात .


ज्ञानदिपामध्ये लास्ट इअरच्या मुलांसाठी निरोप समारोपाचे आयोजन केलेले होते . त्या आयोजनासाठी त्या बिल्डर्स ना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावन्यात आले होते . त्यांनी खूप खूप मोठं मोठी भाषणे ठोकली ज्ञानदिपासाठी आम्ही आमचं सर्वस्व त्यागु वैगरे आणि इकडे सर्वजण गुंग असतानाच तिकडे जे अन्न आज त्या कीलबिलनाऱ्या पाखरांच्या मुखात जाणार होते   . त्या चाऱ्यात विषाचे दंश सोडले होते . ज्ञान दिपातील पाखरे आजपासून ज्ञान दिपाला कायमचे पोरके होणार होते .


त्या बिल्डर्स चे भाषण वैगरे झाले ते बिल्डर्स आणि  त्यांचे सहकारी ताबडतोब तिथून निघून गेले . त्या मुलांनी आवडीने जेवण वैगरे केले . घरी निघायला लागले ज्ञानदिपाच्या गेट पर्यंत जाईपर्यंत च प्रत्येक जण जमिनीवर कोसळू लागला . तर कोणाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या . आणि ज्ञान दिपातील सर्वच पाखरांचा किलबिलाट कायमचा बंद झाला. 


ज्ञानदीपाचा परिसर ओसाड झाला ..
अशा प्रकारे ज्ञान दिपातील पाखर हरवून गेली  झाला . . 
ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे ..
कोणत्याही घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .


3 comments:

  1. खुप भावस्पर्शी, विचार करण्यास भाग पाडणारी ह्रदयस्पर्शी कथा...आजकाल माणुस माणुसकी विसरुन आपला स्वार्थ साधण्यासाठी काहीही करु शकतो..हे आपण खुप छान प्रकारे कथेतुन स्प्ष्ट केल आहे...सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. अप्रतिम अतिशय सुंदर कथा भावस्पर्शी

    ReplyDelete
  3. अतिशय भावस्पर्शी कथा👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...