नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 12, 2021

पहाटेचे स्वप्न नव्याने सजावे

धुके हे विरत जावे ,
पहाटेचे स्वप्न आता नव्याने सजावे ,
तुझ्यात मी माझ्यात तू ,
हरवून जावे .....

पहाटेचे स्वप्न नव्याने सजावे ,

ओंठाचा गोडवा चहात मिसळावा ,


तुझ्या मिठीचा सहवास रोजचं लाभावा ,


दुरावा कधी येऊच नये ह्या गोड नात्यात ,


माझा प्रत्येक श्वास विरगळावा तुझ्या श्वासात  ,

पहाटे पहाटे दिसावा रोज स्वप्नात ,
कधीतरी यावास सत्यात ,
पहाटेचे स्वप्न सजवण्यास खास  .....


आसपास असल्याचा होऊ दे  भास ,


तोच देईल प्रेमाला नवचैतन्य खास


धुके हे विरत जावे ,
पहाटेचे स्वप्न आता नव्याने सजावे ,
तुझ्यात मी माझ्यात तू ,
हरवून जावे .....
पहाटेचे स्वप्न नव्याने सजावे ,

3 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...