नाव ठेवू लागलं तुला अख्ख गाव ,
धुळीत मिळालं ग तुझ नाव ...
कोणी नाही देणार आता तुला भाव ,
कितीही दाखवलाच तू चांगुलपणाचा आव ,
तरीही सोसावेच लागेल तुला टोमण्याचेचं घाव ...
तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरले त्यात मी तिला टोचून बोलले वरील विषयाचे वारंवार तिच्या मनाला चटके दिले .
चूकच केली होती तिने खूप मोठी चूक त्या चुकीसाठी तिला आता कोणीच माफ करणार नव्हतं अगदी मी ही ...
वारंवार समजावलं तरीही तिने नाही ऐकल . शेवटी आयुष्याचं वाटोळं झालं . गावाने तिला वाळीत टाकलं . आई वडिलांनी तू मेलीस आमच्यासाठी असं घोषित केलं .
तिला आता कुणाचाच आधार नव्हता उरला , सगळा गाव पेटून उठला होता . तिचं बेभान झालेलं मन माझा आधार घेऊ पाहत होता . पण मी तरी कोण होते तिला आधार देणारे . समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता . तिने समजून घेणं मान्य केलं नाही . आयुष्याचं मातेर होईपर्यंत मागे पुढे पाहिलं नाही .
मग आता तरी ती का ? आली होती , माझ्या घरी तिच्या बरोबर माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी का ? आता मी तिला आधार का देऊ ? काय संबंध आता तिचा आणि माझा ? तिने विश्वास घातच केला होता ना आमच्या मैत्रीचा ...
तिचं प्रेम प्रकरण मला खूप पूर्वीपासून माहीत होत . प्रेम कसलं वो भरकटलेल्या वयातील एक आकर्षण ...
आकर्षण एवढं होतं तिला ,
की ती हरवून बसली होती स्वतःला ,
त्याच्यात कुठेतरी तिचं अस्तित्व शोधू पाहत होती ,
त्यालाही तिची धाव कळत होती ,
त्याची वाईट नजर तिच्या चरित्राचा वास घेऊ पाहत होती ,
त्यांची वाईट नजरच तिला प्रेमाची हाक वाटत होती ,
बिचारीला स्त्री स्वाभिमान म्हणजे काय ? कळलाच नव्हता म्हणून च तिचा प्राण आणि श्वास ह्या वाईट नजरेला बळी पडला होता . काय म्हणावं तिला मला तर कळतच नाही .
आज तिचा चेहरा पाहणंही आवडत नव्हत . पण कधीतरी तिच्याशी मैत्री च नातं होतं . ते निभावणं गरजेचं वाटतं होत . एक स्त्री म्हणून तिला समजून घेणं आणि सहानुभूती दाखवणं माझं कर्तव्य होतं . ते मला विसरून चालणार नव्हतं . माणुसकीच्या नात्याने मी तिला घरात घेतल . आणि घरात घेताच एक वाक्य तू आता घमावलेला
विश्वास आता कमावू शकणार नाही . प्लीज माझ्याकडुन तरी कसलीच अपेक्षा ठेवू नको . आता माझा तुझ्यावर विश्वास च नाही .
मी असं बोलले तिचे डोळे खूप खोलवर गेले , शब्दही झाले होते मुके , बंध आठवत होते ते मैत्रीचे जुने ,
काधाचीत ते तिला हवे होते नव्याने मला आता देणे शक्य नव्हते . मी सांगितले ठामपणे .
तुझे माझे आता काय नाते ,
नको मला ते बंध खोटे ,
ज्याच्यामुळे नेहमीच झाले माझे तोटे ,
मी बोलायची तिची आसवं गळा यची , पण ती मला थांबवु
शकत नव्हती . कारण त्यामागे कारणही तशीच होती . तिने मला खूप मोठी जखम दिली होती . त्याची शिक्षा मी आजही भोगत होते . चूक नसताना सगळ्यांच्या नजरेत पडले . तिच्यासाठी नको तेवढं केलं . शेवटी तिनेच मला गोत्यात आणलं . माझं मन कायमचं हिरावून घेतलं .
मला माझ्यापासून पोरक केलं . ती पळून तिच्या प्रेमासाठी मग त्यात माझी काय चूक होती .
मी तरी तीला पळून जाण्यासाठी कधीच प्रोत्साहन नव्हत केलं . उलट वारंवार समजावलं होतं . तू जे वागतेस ते चुकीचं आहे . असं वागू नकोस त्याने नावं खराब होईल .
तुझच स्त्रीत्व तुला उद्या प्रश्न विचारे न . तेव्हा तू काय उत्तर देशील तुझ्यातल्या स्त्रित्वा ला . प्लीज हे सारं थांबव नको वागू अशी . तरी तिने तिला जे हवं तेच केलं . माझं कधीच ऐकल नाही . बरं ठीक आहे तिला जे हवं तिने ते करायला हवं होतं . पण ज्याच्यावर प्रेम करते त्याचा एकदा तरी baiodata चेक करायला हवा होता . जेणेकरून आज तिच्या आयुष्यात हा दिवसच नसता आला .
ज्याच्या विश्वावर सोडला घराचा उंबरठा ,
त्यानेच तिच्यासमोर डाव टाकला होता खोटा ,
तो तिच्या आयुष्यात आलेलं वादळ होत मोठं ,
ते वादळ तिला तिचं आयुष्य वाटू लागलं ,
इथेच तर फसली खरी गोट ...
तिने त्याच्या विश्वावर घर सोडलं . फार फार तर त्याने तिच्यावर एक महिना प्रेम केलं . लग्न तर केलंच नव्हतं तिच्याशी त्याला तर घेणं होत फक्त तिच्या शरीराशी . खेळायच होत ना तिच्या भावनांशी ... संबंध कधीच नव्हता जोडला त्याने तिच्या मनाशी . हे कळलं तिला खूप उशिरा . जेव्हा एक बीज अंकुरल तिच्या गर्भात , तिचा प्रियकर फरार झाला होता विदेशात . कायमचं सेट्टल होण्यासाठी तो तर आला होता फक्त हीची चव घेण्यासाठी . तिच्या आई वडिलांचा बदला घेण्यासाठी .
तिची तरी काय चूक बीचारीची काहीचं माहीत नव्हतं तिला , तिच्या आई वडिलां च्या आणि त्याच्या भांडणा बद्दल म्हणून तर ही चुकली. सुखी आयुष्याला मुकली .
तिने ह्या सगळ्यात एकच चूक केली . तिने त्याच्यावर प्रेम करावं ह्यासाठी मी तिला बळी पाडलं . हे वाक्य ती सगळ्यांसमोर बकली . म्हणून तर ती आज माझी मैत्रीण नाही .
मी आज तिला आज एवढंच समजावलं . तू जे वागलिस ते खूप चुकीची वागली . देवाने तुला त्याची खूप मोठी शिक्षाही दिली . तुझ वाईट असं मी कधीच चींतनार नाही .
मला माहितेय तुझ्यावर आज खूप वाईट वेळ आली .
तू काळजी नको मी तुला वाऱ्यावर सोडणार नाही .पण पूर्वीचे नात मला आता नकोच . तुझी राहण्याची सारी व्यवस्था मी करेन . तुझी डिलिवरी होईपर्यंत मी तुझी स्वतः काळजी घेईन . माणुसकीचा धर्म पुरेपूर निभावेन .
तुला ह्या अवस्थेत एकटीला सोडणार नाही .
पण पुन्हा मी तुझ्याशी नातं जोडणार नाही . कारण ती लायकीच नाही तुझी.
स्त्री म्हणून तुझी व्यथा जाणते ,
आज काय तू भोगत आहे ,
नसेल कळत नीट काही ,
पण तुझा त्रास समजू शकते ग बाई ,
त्यासाठीच ही सहानुभूती दाखवते ,
पण आता तुझ्याशी कोणतेच नाते नको हे मात्र ठामपणे सांगते ....
काल्पनिक कथा ...
ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे . कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ...
No comments:
Post a Comment
Comments plz.