हे नाते पूर्व जन्मीचे भासते ,
बोल बोबडे भाव तुझे मनास भावते ...
गुंफले मी तुझ्यात ,
तू ग राणी माझ्यात ,
आपलेपणा जन्म घेऊ लागला नव्याने ,
कधी तुझ्या तर कधी माझ्या हास्याने ,
मातृत्वाच्या कोमल स्पर्शाने ...
अनोळखी तू माझी मैत्रीण झाली ,
तुझी माझी प्रीत नव्याने बहरली ...
तू
पाचुची कळी ,
माझ्यासाठी खुलली ,
पूर्व जन्मीची पुण्याई फळास आली ,
अनोळखी तू माझी मैत्रीण झाली ..
खूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌
ReplyDelete