पुन्हा त्या जागी जाणं होत नाही ,
आता मी मागे वळून पाहत नाही ,
जे होईल ते स्वीकारते ,
आयुष्य माझं आनंदाने जगते ,
ना कोणासमोर झुकते ,
ना कोणासाठी रडते ,
आयुष्य माझं मी आनंदाने जगते ...
विसरून दुःख भूतकाळातील ,
शोध मी भविष्याचा घेते ,
वर्तमान हे आनंदाने जगते ,
आयुष्य मी माझ मनासारखं जगते ...
ना कोणासमोर सुखाची भीक मी मागते ,
ना कोणासमोर दुःख व्यक्त करते
दुःखातही मी हसतच श्वास घेते ,
आयुष्य माझं मी आनंदाने जगते ....
खूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर व सुरेख अप्रतिम रचना केलीत
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌
ReplyDelete