ते वेळेवर घडायला हवं होतं ,
दिरंगाईने का होईना , कळायला हवं होतं ...
तुझ माझं bludgroup एक होतं ,
मरणाला टेकलेल्या रुग्णाला ते हवं होतं ...
व्याकुळलेल्या रुग्णासाठी तडफडल माझ् मन ,
आपलाच जणू तो अंश वाटल एक क्षण ..
असतील धागे हे पूर्व जन्मीचे ,
तडफडणाऱ्या मनाचे आणि माझ्या हृदयाचे ..
हताश झाले त्याची अवस्था बघून ,
मनात त्याच्यासाठी ममता आली नव्याने उमलून ..
मनात साचलेला मातृत्वाचा शिमगा नव्याने लागला बरसु , काळजाचा तुकडा तो रुग्ण होता माझाच हर्षु ...
एका गर्दीत हरवलेला ,
आज त्या हॉस्पिटल मध्ये नव्याने गवसलेला ,
आज मातृत्वाचा दिवा होता विजलेला ..
हर्षु ही होता ह्या सुंदर आयुष्याला मुकलेला ,
हे जग कायमचं सोडून गेलेला ..
वेळेवर कळायला हवं होतं ,
हॉस्पिटल मध्ये त्याचा श्वास आमची वाट बघत होत ,
एका भेटीसाठी त्याचं मरण अटकल होत ....
अतिशय भावस्पर्शी रचना 👌👌👌
ReplyDeleteखुप भावस्पर्शी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteजबरदस्त रचना खुप खुप खुप खुप सुंदर
ReplyDeleteखुप सुंदर पण तीतकीच भावस्पर्शी , अप्रतीम रचना
ReplyDeleteभावनास्पर्शी.।
ReplyDeleteअप्रतिम... हृदस्पर्षी 🙏🙏🙏🙏
ReplyDeleteKhup chan👌👌
ReplyDelete