प्रेम असेल तर व्यक्त करण्याची गरज नाही . तिथे अडीच शब्दाच्या पुराव्याची ही गरज नाही . सारखं सारखं व्यक्त करण्याची ही गरज नाही .
प्रेम न दाखवता समजून घेता आलं पाहिजे . प्रेमात पुरावा देण्याची गरज नसावी . तू माझ्यासाठी अडीच शब्द बोलायला हवं हा हट्टही नसावा . प्रेम न सांगता समजून घेता आलं पाहिजे .
एकमेकांवर विश्वास असावा , काहीही संबंध नसला तरी , खूप संबंध असावा . एकमेकांची सवय असावी . रोज एकमेकांना वेळ देण्याची गरज वाटावी .
प्रेम ही फिलिंग अडीच शब्दांनी कधीचं पूर्ण होऊ शकत नाही . त्यासाठी एकमेकांच मन समजून घेण्याची गरज असते . न बोलता त्याला तिच्या मनातल कळायला हवं . त्याचं दुःख तिला त्याच्या डोळ्यांत सहज दिसायला हवं .
प्रेमात भांडण हवी नातं तोडण्याची भाषा नाही . जिथे नातं तोडण्याची , संपवण्याची भाषा बोलली जाते . ते नातं नसून केवळ एक मृगजळ असतं . त्यामुळे नात्यात तोडण्याची किंवा संपवण्याची भाषा नसावी .
क्षणा क्षणाला त्याची आठवण येणं ,
ती आता काय करत असेल ह्या प्रश्नांत गुरफटत तिच्या मनाचा ठाव घेणं . हे प्रेम असू शकत ना .
ती चुकली म्हणून त्याने अबोला धरला , अबोल्यात ही तिला खूप मिस केलं . त्याने अबोला धरला म्हणून हिच्या डोळ्यांत पाणी येणं . हे खरं प्रेम .
प्रेम आहे की नाही हे ते अडीच शब्दाचं प्रपोजल कधीच नाही ठरवू शकत . ते तुमचं मन आणि भावनाच ठरवू शकत .
एकमेकांविषयी असलेली ओढ आपुलकी , प्रेम , विश्वास , जिव्हाळा , एकमेकांप्रती असलेला आदर ह्या गोष्टी पुष्कळ आहे प्रेम सिद्ध करण्यासाठी त्या जरुरत नाही . ती फक्त एक फॉर्म ली टी असते .
अतिशय सुंदर रित्या विश्लेषण केले आहे.👌👌👌👌
ReplyDelete