काहूर मनात अजब दाटले होते ,
तुझ्यासाठी काही वेगळेच वाटले होते ,
काय ते कळत नव्हते ,
कुठेतरी तुझ्यातच मन रमले होते ,
एकांतात स्वतः ला मी शोधत होते ,
डोळ्यात साठवून ठेवलेल्या तुझ्या प्रतिमेला न्याहाळत होते ...
चित्त थार्यावर नव्हते ,
नयन माझे आसुसलेले तुलाच बिलगत होते ..
मन वेडे तुझ्या भवती रेंगाळत होते ,
तुला बघताच तेज ते नवखे ,
चेहऱ्यावर खुलत होते ...
अजब क्षण ते सुंदर वाटत होते ,
मला सतत तुझ्याकडे खेचत होते ...
अप्रतिम कविता
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteवाहहह.. अप्रतीम रचना...👌👍💐🍫
ReplyDelete