नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 15, 2021

आजचा दसरा मी कधीच नाही विसरू शकत

आजचा दिवस खूप छान दसऱ्याचा पण माझ्यासाठी मात्र काहीतरी वेगळाच ठरला . पण छानच खूप छान वाटलं . 
माझ्या माणसाचं माझ्याबद्दल असलेलं प्रेम दिसून आलं . आज सकाळीच उठून अंगणात रांगोळी वैगरे काढली .
त्यानंतर अचानक खूप विकनेस जाणवला . मी तेव्हा जी झोपली ते आता जस्ट उठले आणि लिहायला बसले . 

मी आजारी आहे म्हणल्या वर माझ्या ताईची मुलगी भक्ती ती माझ्याकडे आली . माझे बाबा ताप असल्यामुळे पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर टेकवत होते . तर ती ही मध्ये लुटपुट करत होती . मी लावते दुर्गा मावशीला पट्ट्या अस म्हणत तिच्या कोवळ्या स्पर्शाने अर्धा विकणेस आणि ताप गेला . माझी आजी पण खूप चांगली आहे तिने माझ्यावरचं सर्व काम केलं.  बाबा तर विचारूच नका . ते तर खूप चांगले आहेत . मला बर नसल्यावर माझं त्यांच्या मनात असलेलं स्थान प्रेम खऱ्या अर्थाने दिसून येत . 
माझी आई नाही पण बाबा लहान पणापासून च माझ्या आजार पणात खूप काळजी घेतात . तीन वर्षानंतर आज पहिल्यांदा दुखलं . ते तर खूप नाराज झाले . कारण त्यांची खूप ईशा होती . आज त्यांच्या शेड समोर मीच रांगोळी काढावी आणि पूजा ही मीच करावी . पण शक्य झालं नाही . मग त्यांनीच केली . 

खरच आजचा दसरा मी कधीच नाही विसरू शकत .

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 
सकाळ पासून द्यायच्या बाकी होत्या .
Happy dasra ....

3 comments:

  1. खूप सुंदर लेख.....👌👍✍️...तुला आणि तुझ्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...👌👍✍️🍫

    ReplyDelete
  2. छान लीहीलय सखी...कुटुंबाच प्रेम असच असत... काळजी घ्या...👌👍💐🍫


    ☘️☘️ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा☘️☘️

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लेख 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...