नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 9, 2021

त्या वळणावर

त्या वळणावर आपण भेटलो ,
न भेटलो होतो कधी असे ,
शब्दा पुरतीही ओळख नव्हती ,
तरीही तुला माझी आस होती .....
मला तुझी ओढ होती .....

त्या वळणावर मी उभी राहिली ,
उन्हाचे चटके होते सोबतीला ,
त्यात तुझ्या सावलीचे आलिंगन लाभले ,
त्या वळणावर तुझ्याशी नाते हे जुळले .....

शरदात चंद्र तो खुलतो ,
अरे त्याचेच प्रतिबिंब तू मला भासतो ,
त्या वळणावर चांदण्याची रात ,
त्यात तुझी मिळालेली साथ ..
मनी दाटलेला प्रेमाचा गोडवा आठवतो ...

5 comments:

  1. खुपच सुंदर रचना 👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर रचना..👌👍✍️🍫

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  4. क्या बात है सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  5. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...