नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 9, 2021

नियतीने माणुसकी दाखवली

माणसाने माणुसकी जपावी ,


जिवापाड ती जपावी ,


एकवेळ तहान भूक विसरावी ,


पण माणुसकीची शिकवण न विसरावी ....


माणुसकी खूप महत्वाची असते . माणसाचं हृदय कोमल असावं , स्पर्श करताच दुःख विसरून जावं . निश्टुर


निर्दयी नको . असं प्रत्येकाला वाटतं . मलाही आणि ह्या कथेतील मुलीलाही वाटत होत माझ्या माणसांची मन कोमल असावी . निर्दयी नसावी . का माझी हक्कांची माणस एवढी निर्दयी आहेत . असा विचार करून ती थकत होती . काय असेल तिची उत्सुकता आहे ना मलाही आहे लिहिण्याची ......


मानसी कष्टाळू , कनवाळू , दयाळू माणुसकी जपणारी . प्रत्येकाशी प्रेमाने वागणारी . आईविना पोरं बिचारी , सावत्र आईंच्या छायेखाली वाढली . छाया तर मिळाली च नाही उलट , छायेतही धूप मिळाली .


वडील तिचे कामानिमित्त सतत बाहेर राहायचे . काही दिवसांनी पुण्याला नोकरी मिळाली म्हणून पुणे त्यांना नाईलाजाने गाठावं लागलं . मानसीला सोडून जाण्याची ईच्छा चं  होत नव्हती . पण काय करणार शेवटी पोटापाण्याचा प्रश्न होता . आणि सुरुवातीला मानसी ची दुसरी आई तिचं प्रेमाने करायची . त्यांची मस्त अट्टी -  बट्टी जमली होती . त्यामुळे सुधाकरराव मानसी चे वडील ह्यांनी  डोळे झाकून तिला वसू मानसी ची सावत्र आई हिच्या विश्वासावर सोडले . आणि ते पुण्याला शिफ्ट झाले .


ते पुण्याला शिफ्ट झाले आणि लगेच मानसीच्या आईचे चित्र पलटले . तिने मानसी चे चालू असलेले शिक्षण बंद केले . तिच्या अंगावर सारी  घरची आणि दारची   कामं सोडली . तिने नकार दिला तर नकार देता क्षणीच तिच्या आईने तिला लाकडाचे चटके दिले जिभेला उलथन्याचे चटके दिले . मजबुरिने मानसीला सातवीतच चालू असलेले शिक्षण बंद करावे लागेल आणि नशिबाचे भोग भोगावे लागले .


अधून मधून बाबा विचारपूस करायचे . तेव्हा तिची आई तिला बाबांशी बोलूच द्यायची नाही . आणि  जर कधी बाबाने खूप हट्ट केला तर , कधीतरी तिला बाबांशी बोलायला मिळा यचं . 


जर कधी बाबाने बाबाने विचारलं , " बाळा कशी आहेस ?"


तर हिचे डोळे पाण्याने तुडुंब भरून यायचे . तोंडातून शब्द फुटतं नव्हते . ती  उर आणि हुंदके सांभाळत फक्त एवढीच बोलायची , "  मी मस्त , तुम्ही कसे आहात ? "


" बाबा लवकर ह्या " अशी बोलायची इच्छा असूनही ती बोलू शकत नव्हती . कारण तिची आई तिच्या बाजूला जलक लाकूड घेऊन उभी असायची . मी मस्त मजेत आहे . तुम्ही तुमची कामं निवांत करा . आई खूप काळजी घेते . असं बोलण्यासाठी तिची आई तिला दटवायची .


तिच्या धाकाने ती काहीचं बोलू शकत नव्हती . होणारा अन्याय सहन करत होती .


मानसी लहानाची मोठी होईपर्यंत तिचा शारीरिक मानसिक छळ हा नेहमीच होतं राहिला . ती त्याला प्रत्यू त्तर देऊ शकली नाही .


खूप दिवसांनी बिचारी च्या कानावर आनंदाची बातमी पडते . बातमी ऐकून मानसीला आकाश ठेंगणे झाले . बातमी च अशी होती . तिचे बाबा आता कायमचे घरी परतणार होते . ते पुन्हा कधीही कामानिमित्त बाहेरगावी जाणार नव्हते . पण ते नेमके कधी येणार हेच बिचारीला माहीत नसतं ते सरप्राइज असतं . त्यामुळे ती थोडीशी नाराज होते , आणि बाबा येताय ना ते महत्वाचं सरप्राइज म्हंटल्यावर काय सांगा आजच ते आपल्याला मिळेल .


असं सांगून ती स्वतः ला समजावत राहायची .


ज्या दिवशी सुधाकर राव घरी येणार असतात . त्या दिवशी सुधाकरराव तिच्या आईला सांगतात .  " मी आज येतोय प्लीज पोरांना सांगू नको . आणि प्लीज कोणालाही आज कुठेही बाहेर जाऊ देऊ नको . मी घरी आल्यावर मला माझी सारी पोरं माझ्या डोळ्यासमोर हवी . विशेष करून माझी मनु , चल मी ठेवतो आता निघण्याची तयारी करावी लागेल ."


असं म्हणून ते फोन ठेवून देतात इकडे ते येणार म्हणून वसुची तळपायाची आग मस्तकात गेली . ते येणार म्हंटल्यावर आपलं सारं पितळ उघडं पडणार . ह्या भीतीने तीला धासती भरली .


काय करावं सुचत नव्हत . ते येणार त्या दिवशी वासूने मानसी घ राबाहेर राहील अशी जास्तीची काम सांगितली . तिच्या काम सांगितले आणि मानसीने नकार दिला असं आज पर्यंत झालं . नव्हत कारण हिने नकार दिला तर मग हिला चाबकाचे फटके आणि जलक्या लाकडाचा अनुभव घ्यायला मिळायचा . जो की खूप जीवघेणा होता .त्यामुळे ती साऱ्या कामांना होकार द्यायची .


तिचे बाबा घरी आले त्यांनी सगळ्यांना जवळ घेऊन सोबत आणलेल्या भेटवस्तू दिल्या . त्यांचे डोळे  आतुरले होते ते   मानसी ला बघायला . पण मानसी काही त्यांना दिसत नव्हती . त्यांनी वसुला विचारले , " वसू मानसी कुठे  गेली काही सांगून गेली का ? "


वसूने आल्या आल्या च त्यांच्या मनात वसू विषयी तिरस्कार निर्माण होईल असं तिच्या वागण्याचं वर्णन केलं . त्या वर्ण नावर सुधाकर भाऊंचा विश्वास बसत नव्हता . पण थोड्या वेळाने जे घडलं त्याने त्यांना वसूच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं .


वसू एका अनोळखी मुलाच्या गाडीवर बसून आली होती , ती ही त्याला चांगली च खेटून ची टकून  बसली  होती .


डोकं पूर्ण त्याच्या खांद्यावर टेकवलेल होतं . कसली तरी धुंदी चडली असावी . नशा केली असावी कधाचीत तिने ,  वाटतं तर तसचं होतं .


ती गाडीवर उतरली सुधाकर भाऊंनी तिला विचारलं , " काय आहे मनु हे , दिवसा ढवळ्या उन्हात काय थेर सुचताय तुला . एवढी कशी बदलली माझी मनु नशाच्या भरात मानसी उलट सुलट बोलली . मनात असलेलं एवढं मोठं दुःख ती बडबड बोलली . तिचं दुःख खरं असलं तरी , तिची वेळ चुकली होती बोलण्याची म्हणून कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही . तिच्या बापाने तर तिला खोलीत बंद केलं . वसुने अजुन आगीत तेल ओतले नको नको ते बोलून सुधाकर रावांचे कान भरले . शेवटी मानसी चे मामा ह्यांनी सुधाकर रावांना सुचवले  तुम्ही गावात चर्चा व्हायच्या आत मानसी च  लग्न उरकून टाका . तिच्या बाबांनाही ते पटतं . ते तिच्यावर खूप चिडतात तिच्याशी अबोला धरतात . ते तिच्या मामाना म्हणतात . " तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा . मला तिचं तोंडही बघण्याची इच्छा नाही . ती आजपासून मेली माझ्यासाठी आणि ते तावातावा त घराबाहेर जातात . तिचे मामा तिच्यासाठी खूप चांगला मुलगा बघतात . लग्न लावून देतात .


तिचं नशीब चांगलं म्हणून तिला खूप प्रेमळ सासू सासरे मिळाले होते . नवराही खूप जीव लावणारा निघाला . आयुष्य सोण्यापरी सुंदर उजळून निघाल . तिला माहेरच्यांची आठवण पण नव्हती येत.  तिथे तर बिचारीने नेहमीच दुःख भोगलेले होते . 


लग्नाला दोन एक वर्ष पूर्ण झाले होते . तिच्या नवऱ्याच्या जवळच्या मित्रांसाठी पार्टी ठेवली होती . त्यात एक जण तिला बघताच आश्चर्य चकित होतो.  आणि विचारतो , " तू इथे कशी ? "

ती ही त्याला म्हणते  , " मी इथेच असते . पण तू इथे कसा ? का आलास ?  माझ्या आयुष्य बरबाद करुन फरार झाला . पुन्हा का आलास माझ आयुष्य बरबाद करायला . निघ इथून . "


ती कडक शब्दात त्याला दम देत असताना तिच्या नवऱ्याने पहिले आणि तो तिला सावरायला आला . 


"  अग का एवढी चिडतेस त्याच्यावर मित्र आहे  .


तो माझा मीच बोलावलं त्याला हा मित्र तुमचा ज्याने माझं आयुष्य बरबाद केलं . माझ्या एकमेव अश्या हक्काच्या माणसाला माझ्यापासून तोडल . "


" म्हणजे काय बोलतेस तू मला काहीच नाही कळत ,  तू ह्याला कशी ओळखतेस ? "


तेवढ्यात त्याचा मित्र बोलतो , " थांब शेखर मी सांगतो तुला सगळं " तो आधी पाय धरून मानसीची माफी मागतो .


तुम्ही माफी नका मागू पण  त्या वेळी असं का वागला एवढंच सांगा मी खूप ऋणी असेल तुमची . "


त्यावेळी मला पैशाची नड होती . म्हणून मी तसा वागलो तुमच्या आईने ते कृत्य करण्यास मला भाग पाडलं . मनात 


नसूनही मी तसा वागलो . "


तेवढ्यात तिचे आई वडील येणार होते ते ही ते संभाषण ऐकतात . आता सर्वांना कळून चुकलं होतं की तेव्हा चूक मानसीची नव्हती . तिचे बाबा तर तिच्या आईवर हात उचलतात तेव्हा तिचं जाऊन त्यांचा हात पकडते आणि बोलते. "  तिने तिची माणुसकी सोडली म्हणून आपण आपली माणुसकी सोडायची का ? ती चुकली तिला माफ करा . "


आज नियतीने माझ्यावर दया दाखवली माझ्या वर लागलेले सारे कलंक मिटले . आज मी कोणाशीही निश्ट्युर वागणार नाही.  तुम्हीही वागू नका .


माणुसकी माणसाचे आत्मदर्शन घडवते . ती कधीही विसरू नये .


3 comments:

  1. खूपच सुंदर👌👍

    ReplyDelete
  2. खूप छान...👌👍✍️🍫

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...