आज मंदिरात गेले होते ,
माझ्यासाठी काहीचं नाही ,
त्याच्यासाठीच मागितले होते ,
त्याच्यासाठीच बर का ,
त्याने मला खूप हसवले आणि छळले होते .....
माझे आयुष्य त्याला लाभो ,
हेचं मागितले ,
माझ्यातील समज जरा त्यालाही दे ,
आम्हाला जोडून ठेवायची जबाबदारी तूच घे ,
हेचं मागितले ....
नदीच्या तीरावर त्यांच्या आठवणीत गुंग झाले ,
सुर्य नारायणाने ते पाहिले ,
नदीच्या पात्रात पडलेल्या किरणातही ,
मला त्याचेच प्रतिबिंब दिसले ,
माझ्या मनात त्याचे प्रतिबिंब असेच झळकू दे ,
हेचं मागितले ...
खूपच सुंदर लिहिलंय...मस्तच 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम काव्य रचना...मस्तच👍👌✍️🍫🍫🌹
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना ��������
ReplyDeleteजो कोणी असेल तो भाग्यवंत असेल त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते खुपच सुंदर अप्रतिम
ReplyDeleteवाहह.. अप्रतीम काव्यरचना...👌👍💐🍫
ReplyDeleteसुंदर काव्य 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete