शब्द माझे मुके झाले ,
तुझ्या सहवासात मन हरवून बसले ,
कोमल तुझ्या स्पर्शाने मन हळूच लाजले ,
गाली एक गोड खळी उमटली ,
तुझ्या माझ्या प्रेमाची छबी ती जणू भासू लागली ,
ओढ प्रेमाची अंतरंगी दाटू लागली ,
मनात दाटलेली एक कल्पना तुझ्यात लुप्त झाली ,
सांगता सांगताचं ती राहून गेली ,
नकळत राजा तुझ्या माझ्या संसाराला नवी सुरुवात झाली ...
तुझ्यात माझी अन् माझ्यात तुझी प्रीत हसू लागली ,
एकमेकांना एकमेकांची ओढ अपरुक वाटू लागली ...
त्या ओढीतच संसाराची गोडी दाटू लागली ...
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteखुपच छान लिहीलयस 👌👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌💐
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDelete