नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 12, 2021

तुझ्यात मी असावे

स्वप्न मी  पाहावे ,
सत्य तू  दिसावे ,
तुझ्यात मी असावे ....

प्रेम बंधन जुळावे ,
नात्याचे हे धागे विनावे ,
सहवासाचे ठिगळ जोडावे ,
तुझ्यात मी असावे ...

चंद्राची शीतलता तुझ्यात रुजवावी ,
तुझ्या मनात माझी प्रीत उमलावी ,
तुझ्या हृदयात माझी प्रतिमा ठसावी ,
तुझ्यात मी असावी ...

तुझ्यात मी असावे ,
तुझ्यासारखे कोणी नसावे ,
स्वप्नी तुझे नाव दिसावे ,
तुझ्या नावा पुढे नाव माझे लागावे ,
तुझ्यात मी असावे ...


3 comments:

  1. खुपच सुंदर रचना 👌👌

    ReplyDelete
  2. खूपच छान 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...