नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 19, 2021

बंधन

बंधन हा शब्दच खूप त्रास दायक आहे . माणसाचं स्वंतत्र  आणि अस्तित्व हिरावून घेणारा  आहे . एवढंच नाही तर अनेक नाती उध्वस्त होण्याचे एकमेव कारण हे बंधन आहे . त्यामुळे कधीच कोणावरही बंधने लादू नये .

प्रत्येकाला ज्याचं त्याचं स्वतंत्र द्यावं .  कित्येक वेळेस बंधन ही काळजी पोटी लादल्या जाती . पण तेव्हाही काळजी पोटी लादल्या गेलेली बंधन ही काळजी  नाही तर , ती गुलामीची परिभाषा वाटते नको वाटतं ते बंधन ..


एखादा व्यक्ती आपला कितीही हक्काचा असला तरी , चुकूनही त्याच्यावर बंधने लादू नये . आपण त्याच्यावर जेवढे बंधन घालू तेवढा तो व्यक्ती आपल्यापासून दूर जातो .


जरी सख्खे आई वडील असतील तरीही त्यांनी आपल्या मुलांवर बंधने लादू नये . त्यांना पूर्ण स्वतंत्र द्यावं . शिकण्याचं , वैयक्तिक विचारांचं , राहण्याच , मोकळा श्वास घेण्याचं . त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या परीने जगण्याची संधी द्यावी.  चुकले तर मार्गदर्शन करावं . ना की बंधने लादून त्याचं आयुष्य थांबवावं .


आणि कुठल्याच व्यक्तींनी  स्वतःवर ही कोणतीच बंधन लादून घेऊ नये , कोणी लादली तर ती बंधन  झिडकारून द्यावी . अगदी आपल मन आपल्यावर बंधन घालण्याच  प्रयत्न करत असेल तरीही ते स्वीकारू नये .


बंधन माणसाला खूप खालच्या पातळीवर नेऊन सोडतात .खरं सांगायचं म्हटलं तर , जिथे बंधन तिथे गुलामी जन्म घेत असते.  तिचं अस्तित्व निर्माण करत असते . ती जगण्यास खूप हानिकारक असते .  माणसाची माणुसकी तिथे लयास गेलेली असते . एक भावना शून्य


निर्जीव एवढंच काय ते अस्तित्व उरलेलं असतं .

नको मनावर ओझे कशाचे ,

खुले असावे श्वास माझ्या हृदयाचे ,

मीच असावे चालक माझ्या विचारांचे ,

बंधन जुगारून  गुलामीचे ,

आयुष्य मला माझे हे जगायचे ....

नको कुणाचा अधिकार गाजवण ,
माझं मलाच लाजवण ,

स्वंतत्र आयुष्य जगणं हे माझं स्वप्न ,

नको आता ह्या सुंदर आयुष्याला कसलंच बंधन ...

जे हिरावून घेतील माझ जगणं ,


मुश्किल करतील माझ हसण ,
मग नशिबी असेल नुसतच रडणं ,
त्यापेक्षा नकोच आता बंधन ...



2 comments:

  1. खूपच सुंदर विषय घेतला आहे मला खूप आवडला लेख आजच माझ्या एका आजी सोबत या विषया वर चर्चा झाली होती पण तुम्ही खूपच छान सांगितले आहे. खरच वास्तविक स्थिति मांडली आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लिहिलंय...किती सुंदर लिखाण...अप्रतिमच👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...