असावे माझे प्रेमाचे गाव ,
त्याला असावे फक्त तुझे नाव ...
तुझ्या माझ्या विश्वात हरवून जाऊ ,
नको रे आता तू उगाच भाव खाऊ ...
कळलं आहे मला प्रेम झालय ,
तुझ सर्वस्व तू मला वाहीलय ,
कारे राजा उगाच अडकतो भूतकाळात ,
ते अडीच शब्द बोलता बोलता पुन्हा साठवून ठेवतो मनात ..
एक क्षण एकमेकांशिवाय करमत नाही ,
तुझ्याशिवाय मी पूर्ण होत नाही ,
माझ्याशिवाय तुझ अस्तित्व पूर्ण होत नाही ...
तुझ्यात मी माझ्यात तू हेच खरे प्रेम ,
ते दिलेस तू मला मी तुला ..
नाते आणले पूर्णत्वाला ..
अप्रतिम बेटी
ReplyDeleteखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete