कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते ,
कोणाच्यातरी अंतकरणातून आलेली ती एक हाक असते ,
कधी ...
भूकाळातील मनावर झालेल्या जखमांची ती साक्ष देते ,
तर कधी ...
भविष्यातील एक आपल्याला हवे असणारे सुंदर चित्र रंगवते...
कधी ....
समाजात घडणाऱ्या विक्षिप्त घटनांवर ती चर्चा करते ,
तर कधी ...
कोरपर्डी सारख्या घटनांनी ती डोळ्यांत पाणी आणते ...
कधी ....
आठवणींच्या हिंदोळ्यावर नेते ,
तर कधी ....
हरवलेले बालपण जागी करते ....
अहो कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते ,
कवी लोकांच्याच आयुष्यातील ती एक सुंदर कल्पना असते ...
तर कधी कधी वास्तविकता ही असते ..
कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते....!!!
खुप सुंदर वास्तवदर्शी रचना...सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteक्या बात है..!!
ReplyDeleteअप्रतिमच..खूपच छान ..!👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
अतिशय सुरेख सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखुप छान अप्रतिम
ReplyDelete