तिमिराला तमा न कशाची ,
कवितेत माझ्या गाणी प्रकाशाची ,
ओढ मनाला तुझ्या स्पर्शाची ,
हरवलेल्या माझ्या हर्षाची ( आनंद )
आभाळभर चांदणे पांघरलेले ,
डोळ्यांत तुझ्या भाव माझे दाटलेले ,
मनभर चैतन्य प्रेमाचे बहरलेले ,
मेहंदीच्या पानावर नाव तुझे कोरलेले ....
तुझ्यासवे स्वप्न माझे सजलेले ,
कवितेत माझ्या अनमोल ते जपलेले ,
क्षण ते नवखे तुझ्या माझ्या प्रेमाचे ...
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteअप्रतीम...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌
ReplyDelete