डोळ्यात शब्द ते पाणावले ,
भाव ते अंतरी का उठले ,
आज माझेच शब्द मला बोचू लागले ,
माझेच मन माझ्यावर रुसले .....
ओठांवरचे हसू माझे बोलेनासे झाले ,
तेज चेहऱ्यावरचे मावळून गेले ,
आता शब्दही माझे फिके पडू लागले ,
माझ्याच माणसांना समजवण्यास मी कमी पडले ...
आज मी मला पोरकी झाली ,
देवा अशी कशी रे वेळ आली ,
ना माणसांना माझी किंमत राहिली ,
ना भावनांनी माझी कदर केली
शब्दही माझी मला अनोळखी झाली ...
ओळख आता अशी काहीचं नाही उरली ....
फारच भावस्पर्शी रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय भावस्पर्शी रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDelete