आयुष्य जगायचं म्हंटल्यावर खूप adjust करावं . तर कुठे आयुष्य जगावंस वाटतं . इतकी सारी विचीत्र माणस येतात आयुष्यात त्यांना कसं hundel करावं कळतच नाही . त्याच्या वागण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतात. जगासमोर आपण किती सभ्य आहोत असं दाखवायचं . आणि पडद्याआड आपल्यातील घमंड , अहंकार हा जागी ठेवायचा . काय अर्थ आहे अश्या असभ्य वागण्याला .
मला ना खूप राग येतो . अश्या माणसांचा पण माणुसकीचा धर्म सोडायचा नाही . म्हणून त्यांच्याशी निभावून घ्यावंचं लागत . कितीही राग आला तरी तो मनात कुठेतरी दाबून ठेवावा लागतो . आणि हसत हसत त्याच्या तश्या विचीत्र वागण्याला सामोरं जावं लागतं .
कसं समजावं त्यांना कळतच नाही . कधी कधी ते एवढे विचीत्र वागतात की जाब विचारावासा वाटतो का ग बाई तू असं कसं वागतेस नेमका प्रॉब्लेम काय आहे तुझा ?
मी काय गुन्हा केला की माझा जीव तुला पोरका झाला .
जर तुला नातंचं नसेल ठेवायचं . तर मग कशाला आपलेपणाचं सोंग घेऊन फिरायच . पण समोरच्याला वाईट वाटेल . आपल्यामुळे कोणाचतरी मन दुखावले जाईन . ही कल्पनाचं मनावर ताबा ठेवते . आणि समोरची परिस्थिती इग्नोर करायला भाग पाडते . अगं बाई असतात अशी विचीत्र माणस तुला adjust हे करावच लागेल , आणि आयुष्य हे जगावचं लागेल असं मन सतत सांगत . मग त्याचं तर ऐकावंच लागतं . ते तर आपलंच असतं . लोकांचं वागणं झेळण्यास भाग पाडतं . असं म्हणत सारं सहन कराव लागतं .
आयुष्यात adjustment ही करावीच लागते. जो adjust करू शकतो . तोच हे आयुष्य सुंदर रित्या जगु शकतो. ज्याच्याकडे adjustment ही skil नाही . तो माणूस म्हणून परफेक्ट असूचं शकत नाही ...
हो अगदी खरं आहे 👌🏻👌🏻👌🏻life is a adjustment 🙋😊
ReplyDeleteअप्रतिम सुंदर लिखाण
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि बरोबर लिहिलय 👌👌👌
Deleteअतिशय सुंदर लिखाण केले आहे 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम लिखाण👌👌👌👌💐💐💐
ReplyDelete