नियतीने केलाच होता ,
आता निसर्गानेही केला ,
जन्म सारा मातीत मिसळला ,
अकुरण्याआधीच खुडला ,
देवाचे खूप आभार ,
सहन शक्तीची ताकत दिली ,
वेदने पलिकडचे दुःख दिले ,
सुख सारे हिरावून घेतले ,
कमी वयात खूप सारे ,
अनुभव वाट्याला आले ,
आयुष्य माझे सजले ,
दुःखाने च ते नटले ....
बालपणाची कळी नकळत कोलमडली ,
कोलमडलेली कळी नव्याने फुलली ,
आज निसर्गाने त्याची किमया दाखवली ,
स्त्री जन्माला मी पारखे झाले ,
माझे अस्तित्व माझ्यापासून हिरावून घेतले .
आयुष्याला ग्रहण नवे लागले ....
अतिशय हृदयस्पर्शी रचना ����������
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteभावस्पर्शी रचना...🥺👌👍💐
ReplyDeleteहृदयस्पर्शी रचना
ReplyDeleteनिःशब्द...खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete