ये पुन्हा त्या किनाऱ्यावर ,
तुझच राज्य माझ्या मनावर ,
भाग्यरेषा तुझ्या नशिबाच्या ,
माझ्या नशिबाला जोडलेल्या ,
तू आहेस का रे पाहिलेल्या ,
पाहून त्या किनाऱ्याला ही अपरुक वाटलेल्या ...
भावना तुझ्या माझ्या मनात ,
खोलवर रुजलेल्या ,
पूर्व जन्मीच्या वेदनाही त्यात सामावलेल्या ,
त्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा बहरलेल्या ...
प्राजक्ताच्या कोमल फुलाची आरास ,
त्यात दरवळे
तुझा सुगंध खास ,
ह्या वेड्या मनाला तुझीच रे आस ...
त्या किनाऱ्यावर भेट पुन्हा एकदा ,
मनावर ह्या राज्य कर नव्याने पुन्हा एकदा ...
No comments:
Post a Comment
Comments plz.