प्रेम केलं म्हणजे एकमेकांच्या आयुष्यात येणं गरजेचं असतं असं काही नाही . एकमेकांच्या आयुष्यात न येता सुद्धा केलेलं प्रेम जपता आलं पाहिजे .
आयुष्य एकमेकांसोबत घालवण्यात अर्थ नाही . आयुष्याला एकमेकांशिवाय पूर्णत्व येणार नाही हे नात्याच गणित असावं .
आयुष्यातला प्रत्येक आनंद सोबत शेअर करावा . सुख दुःख वाटून घ्यावी . असं कुठे लिहिलेलं आहे का ? सुख दुःख वाटून घेण्यासाठी आयुष्यात एकच व्यक्ती असावी आणि ती सुद्धा नवरा किंवा बायको एखादा मित्र किंवा मैत्रीण असूचं शकते . एका मित्राला एका मैत्रिणीला ...
लग्न झालं म्हणजे आपण पूर्ण पने बदलायला हवं असं
काही नाही . जुनी नाती विसरून जायला हवं असही नाही . लग्न ही समाजाने निर्माण केलेली एक प्रथा आहे .
सृष्टी निर्मितीच चक्र सुरळीतपणे चालू राहवं ह्यासाठी निर्माण केलेली .
आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न व्हावं हा हट्ट हासही नसावा . झालं तर अतिउत्तम आहे . आणि नाही झालं तरीही हरकत नाही . हिरमुसून जाण्याची गरज नाही . आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहूच शकतो . त्याच्या सहवासात नसलो तरी चालेल , त्याच्या मनात असायला हवं त्याला महत्व आहे .
कारण प्रेम हे कोणत्या वयात कधी कोणावर होईल सांगता येणार नाही . योग्य वयात झालं तर मग लग्न होण्याची शक्यता असू शकते . आणि जातीचा प्रोब्लेम असेल तर मग असूच शकत नाही . किंवा कधी कधी सगळ बरोबर जुळत पण नेमकं नातं च जुळत नाही . हल्लीच आमच्या गावात घडलेली घटना आहे .
जात पात सगळ व्यवस्थित पण नात्यात होत आणि ते पण पूर्ण पने चूकीच . त्यामुळे त्याचं एक होण नियतीने अमान्य केल . मला वाईट वाटलं ही घटना माझ्या मैत्रिणीची होती . पण काय करणार होतो . चुकीचं होत सार समाज कसा मान्य करेल .
त्यामुळे नेहमी असं वाटतं ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ठहास कधीच नसावा. प्रेमाचं तुमच्यावर आहे तुम्ही करा नका करू ते मी सांगणार नाही . मी सांगेन वेगळ्या अर्थाने आणि तुम्ही लावाल भलताच काहीतरी वेगळा अर्थ त्यापेक्षा मी तो विषय टाळणं योग्य ठरेल ...
मी माझ्या परीने वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते ...
प्रेम असेल ना तर जगासमोर दाखवण्याची पण गरज नाही. ते फक्त जपावं प्रामाणिकपणे तुम्ही सोबत असायला हवं असं काही नाही . सोबत नसताना सुद्धा नातं जपता येतं . फक्त त्या नात्यात पवित्रता हवी . अनैतिकता नको अनैतिकता समाजाला कधीही मान्य नसते .
आणि मलाही मान्य नाही ....
माझे विचार पटले तर वाचा चुकल असेल तर ते ही सांगा अल्लड आहे अजुन हवी तशी समज नाही .
याला अल्लड नाही मनत खरच तुमच्या कवितेला दाद दिली पाहिजे खूपच वास्तविकता आहे. लोकांना काही गहभीर्य नाही तुम्ही खूपच सुंदर अप्रतिम शब्द लिहले आहे.
ReplyDeleteएक वेगळाच विषय छान प्रकाराने मांडला आहेस 👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर लिखाण ...आणि अशीच नाती शेवट पर्यंत टिकतात....👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteक्या बात है नित्या...!!
ReplyDeleteप्रेमाची परिभाषा खूपच छान मांडलीये..!!
अप्रतिम ...!!👌 सुंदर लिखाण आणि शब्दांकीत..!!
👌👌👌👌👌👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏.
खुप सुंदर व वेगळे विचार मांडले आहेत...खरचं प्रेम नेहमी ह्रदयापासुन ख
ReplyDeleteकराव...ह्रदयात जपावं...मग ते बरोबर असो वा नसो...!!
छान लीहीलय... शुभेच्छा पुढील लिखाणासाठी...👌👍🍫💐💐💐
अतिशय सुंदर लिखाण 👌👌👌👌खूप छान
ReplyDeleteखरच प्रेम हे मनापासून असावं .त्यात जातीपातीचे ,वयाचे बंधन नसावे
ReplyDeleteमन जुळावी मन जपावी ...तू छान लिहिलंस 🌸🌸👌🏻👌🏻👌🏻