आज अचानक असे का वाटते ?
बांधलेले आनंदाचे घरटे ..
कुठेतरी हरवले ..
किबिलाट मायेचा ...
निर्जीव कसा झाला .
सोनेरी क्षण सुखाचा ..
हातातून निसटून कसा गेला ?
काडी काडी करून ..
बांधले होते घरटे ..
त्यात खेळत होते
बोल - बोबडे ..शब्द प्रेमाचे ..
आनंदाच्या झाडावर सजले होते ते घरटे ..
आज असे कसे झाले ..
त्या आनंदावर दुःखाचे सावट कसे आले ..
असे कसे घराचे घरपण सरले ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.