चांगल्या मनाच्या माणसाला ,
नेहमी रडावचं लागत .
जगासमोर खोट खोटं हसावं लागतं ..
भावनांची कदर करतो तो .
म्हणून स्वाभिमान त्याला पोरका होतो .
जोडलेलं नातं जपण्यासाठी जीव त्याचा तळमळतो
म्हणून तो अनेकदा दुबळा म्हणून घोषित केला जातो .
अपमान - तिरस्कार नशिबी त्याच्या गोंधलेलं ..
तरीही चांगुलपणाचं अंगिकरायचा त्याचं ठामपणे ठरलेलं ,
नाही कधी अहंकाराला स्पर्श करायचा ..
माणुसकीला डाग कधी लावायचा ..
मनात त्याच्या रूजलेल ...
म्हणूनच तर चांगुलपन त्याने आजवर आहे जपलेलं.
दुर्गा मते
खूपच छान नित्या...✍️👌👍🍫🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना ✍️👌👌👌
ReplyDelete