अचानक येऊन मला बिलगल ..
थर थर कापू लागल ..
ओढणी मध्ये माझ्या चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागल ..
अवस्था त्याची पाहून ..
मन जरा हिरमुसल ..
अनोळखी तो बोलू की नको ..
मन अडखळल ..
ओळख पाळख काय पाहतेस . अवस्था बघ त्याचं वय बघ .तीन वर्षाचं कोवळ पोर ते किती घाबरल ..तुझ्या लहान भावापेक्षा ही लहान. जवळ घे काय झालं ? विचार पुस कर ..मन म्हटलं...आणि लगेच त्याला जवळ केलं ..
" काय झालं बाळा " त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला विचारल . प्रत्युत्तर मला मिळालं नाही . त्याला एवढ्या प्रेमाने स्पर्श केल्यानंतर ही त्याचं थर थर कापण अजूनच वाढल .
" अरे काय झालं बाळा ? सांग मला ..तुझ्या मम्मीच नाव काय ? तुझ्या पप्पाच नाव काय ? घाबरु नकोस अरे , मी पण तुझी दिदी आहे . सांग मला घरी जायचं आहे का ? मी नेऊन सोडते तुला " तो काहीच न बोलता . मोठं मोठ्याने रडायला लागला .
" अरे ! हे काय का रडतोस ..मी तर तुला काहीच केलं नाही . तुझ्यावर रागवले पण नाही . चिडले पण नाही . प्लीज रडू नको रे शांत हो बाळा " त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला . तरीही त्याचं रडण काही थांबेना .
तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना . त्याच्या आड एक कुत्र येऊ लागलं . कुत्र्याला पाहून तो पुन्हा घरात येत . मी दोन तीन वेळेस त्याची गमंत त्याची घाबरलेली अवस्था पाहिली .
" अरे ह्या कुत्र्यांची भीती वाटते का तुला ? चल मी तुला घरा पर्यंत नेऊन सोडते " त्याला मी अर्ध्या रस्त्या पर्यंत उचलून नेलं . आणि मेन रस्त्यावर गेल्यावर कडेवरून खाली उतरवलं . त्याला जस मी खाली उतरवल तसा तो पुन्हा माझ्या घराकडे धावत जाऊन माझ्या घरामध्ये लपला .
" अग दुर्गा कोण आहे तो ? " माझ्या काकूने ही मला विचारल कारण तो त्यांच्या ही ओळखीतला नव्हता .
" माहीत नाही काकू ..किती वेळ पासून माझ्या घरात आहे . मी खूप विचारल त्याला कोण तू काहीचं सांगायला तयार नाही . काही विचारल तर फक्त रडतो . तुला नेऊन सोडते म्हंटल तर घरात पळतो . " मी काकूंना त्याची स्टोरी सांगत होती . तेव्हाच एक बाई कोणालातरी शोधत माझ्या घराकडे आली .
" माझ् पोरग आलं का इथे ? " ती गल्लीतील साऱ्याच बायकांना विचारत होती . त्या बाईचा आवाज त्या मुलाच्या कानावर पडला असावा . तो येऊन त्या बाईला
घट्ट बिलगला ती बाई दुसरी - तिसरी कोणी नसुन त्याची आई होती . थोड्या वेळाने कळलं ..
" काकू हा तुमचा आहे " मी विचारल
" हो माझाच आहे " त्यांनी ही सांगितल .
" मग हा काहीचं बोलत का नाही . मी काही विचा रायला गेले . तर फक्त रडतच होता . असं का वो " मी विचारल
" अग मी शेतात गेले होते . तेव्हा त्याचा बाप पिऊन आला . आणि त्यानी त्याला खूप मारल ग म्हणून असा वागत असेल . भीती वाटली असेल त्याला त्याच्या बापाची म्हणून तो घरी यायला घाबरत होता . " त्यांनी सांगितल .
" Ohh सॉरी काकू ..सॉरी बाळा " मी म्हणाले त्या निघून गेल्या . पण मला खूप वाईट वाटलं .
एवढ्याशा बाळाला त्याच्या बापाने दारू पिऊन विनाकारण मारल . एवढं की त्याच्या वडिलांबद्दल त्याच्या मनात दहशत निर्माण झाली . ती ही एवढी की त्याने अनोळखी घरात राहण पसंद केलं . पण घरी जायला तो घाबरु लागला . खरच आपल्या मुला बाळापेक्षा ती दारू एवढी महत्वाची आहे का ? असा प्रश्न पडला. आणि लिहावस वाटलं ..
काहीतरी मनातलं ...
पेय दारूचे जवळ करू नकोस ..
सुखाचे घर तुझ्या मोडण्याचे कारण तू ठरू नकोस .
व्यसन काहीचं कामाचे नाही ..
तुझा परिवार हेच आहे तुझ सर्व काही ..
जाण रे तू जरास ....
हेचं काही तरी मनातलं ..
काही क्षणात साचलेल .
दुर्गा मते
Very very nice 👌 👍🏻 👏
ReplyDelete