ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे . माझ्या वास्तवाशी संबधित नाही . ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ..
आज निलिमाच्या घरात . तिच्या चुलत नंदेच म्हणजेच मोक्षदाचे लग्न होते . त्या दोघी एकमेकांना सख्या बहिणी प्रमाणे जीव लावायच्या . का नाही लावायच्या . नीलिमा चे लव्ह मॅरेज आणि तीच माहेर ही खूप दूरवर त्यामुळे तिच्या सासरचे तिला खूप जीव लावायचे . आणि शिवाय दोघी मध्ये वयाच ही फार काही अंतर नव्हत . आणि मोक्षदा आणि विशाल म्हणजेच नीलिमाचा नवरा मोक्षदाचा भाऊ ह्या दोघांचं ही खूप छान रिलेशन होत. त्यामुळे जेवढ प्रेम मोक्षदा भावावर करायची . तेवढंच प्रेम ती नीलिमा वर ही करायची .
तर आज त्यांच्या घरात लग्नसोहळा होता. तो लाडक्या मोक्षदा चा . फॅमिली तील सर्वच मेंबर खूप खुश होते . पण
आपली लाडकी आणि समजस नीलिमा मात्र खूपच अपसे ट होती . तिची नाराजगी तिच्या चेहऱ्यावर सहज दिसत होती. तिचा हळवा आणि सुकून गेलेला चेहरा बघून विशाल मनोमन नाराज व्हायचा . पण बिचारा काहीचं करू शकत नव्हता.
नीलिमा ची जेव्हा ही केव्हा माहेरी जाण्याची इ श्चा होई . तेव्हा ती लगेच पुरी होईल असं नव्हत . कारण तिचं माहेर खूप दूर. आणि एवढ्या दूर मला माझ्या आई बाबांनी का दिलं ? असं म्हणत ती कोणाजवळ मनमोकळे पणाने रडू शकणार पण नव्हती. कारण तिचं लव्ह मॅरेज होतं . मग रडणार तरी कोनापाशी ' लग्न झाल्यापासून ते आज पर्यंत च्या प्रवासात ज्याने एका शब्दानेही कधी दुखावलं नाही . त्या प्राण प्रिय विशाल जवळ की , पुढचा मागचा समाजाचा विचार न करता . लव्ह मॅरेज हसत हसत परमिशन दिलेल्या तिच्या आई वडिलांजवळ . ती नेहमीच द्विधा मनःस्थितीत सापडत होती . आणि मनातल्या मनातच तिची वेदना झाकून ठेवत होती. पण ती वेदना विशालला सहज दिसत होती . पण तिला वाईट वाटू नये म्हणून तो तिला सहानुभूती नव्हता दाखवत ..पण तिचा कोलमडलेला चेहरा पाहून तो ही नाराज व्हायचा .
त्यांच्या लग्नाला साधारण दोन वर्ष झाली असतील अजुन पर्यंत एकदा ही तिचे आई वडील तिला स्वतःहून कधी माहेर पणाला नेण्यासाठी आले नव्हते . जेव्हा हिला माहेर पणाला जावस वाटायचं तेव्हा विशालचं तिला माहेरी नेऊन सोडायचं आणि परत घ्यायला ही जायचा . त्यामुळे अर्थातच तिचे सासरकडची मंडळी तिला टोमणे मारायची . बिचारी अगदी कोलमडून जायची .
पण परिस्थिती चं अशी होती की , तिला मनस्थिती बदलन भाग होती . आणि तिने ही ती बदलली होती . पण आज मात्र ती खूपच नाराज झाली होती .
कारण मोक्षदाच लग्न म्हणजे त्यांच्या घरातील शेवटचं कार्य होतं . ह्या लग्नाला सर्वच पाहुण्यांनी उपस्थिती दर्शविली होती . सोडून निलिमाची माहेरची मंडळी . त्यामुळे आज तिला सासरच्या मंडळींच तर ऐकावंच लागलं . पण त्याचबरोबर लग्नाला ज्यांनी ज्यांनी उपस्थिती दर्शवली होती . त्या सर्वांनीचं तिला खूप ऐकवलं.
थोरल्या आत्या म्हणजे सगळ्यात जास्त त्याचाच दरारा होता . त्यांनी तर तिच्या डोळ्यांत टचकन शब्द वापरले .
" काय ग नीलिमा तुझ्या लग्नाला ..जवळ पास दोन वर्ष होतं आली . अजुन पर्यंत माझ्या माहिती नुसार तुझ्या माहेरची मंडळी ने सासरी उपस्थिती दर्शवली नाही . कंटाळा येतो की काय तुझ्या माहेरच्या लोकांना तुझ्या सासरच्या लोकांचा ..आज ही नाही दर्शवली . त्यांना माहीत नव्हत का ग ? मोक्षदाच लग्न हे ह्या घरातील शेवटचं कार्य आहे . " बोलून आत्या थांबल्या . पण नीलिमा च्या भावना मात्र अनावर झाल्या .
" नाही आत्या अस काही नाही " ती एवढंच बोलू शकली .
" मग कस ग " आत्याने हेटक्याखाली विचारल . तेवढ्यात समोरून विशाल आला . आणि लांबणार संभाषण आवरत घेतल . आणि नीलिमा ला रूम मध्ये जायला सांगितल .
आणि नीलिमा ही आता रूम मध्ये जाऊन सकाळपासून घडलेल्या घटनांचा विचार करत होती . विचारांनी कधी ओघळती वाट धरली तिचं तिला ही कळलं नाही .
" नीलिमा मला माहितेय तू सकाळ पासून घडलेल्या घटनांचा विचार करत आहेस ना " विशाल ने हळुवार तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला विचारल ..
" नाही वो " तिने विशाल ला एक घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कुशीतच ती रड रड ली .
" मग हे अश्रू कशासाठी " विशाल ने आपल्या दोन्ही हातात तिचा सुकलेला चेहरा पकडून तिच्या डोळ्यात साचलेल तळ आठवण्याचा तो प्रयत्न करू लागला .
" ते असेच " ती ही डोळे पुसत स्वतः ला सावरण्याचा प्रयत्न करू लागली .
त्याने तिच्या बोलण्यावर नाजूक स्मित केलं ..
निरागस तुझी वानी ..
शब्द पडताय का कानी ..
तूच माझ्या दीलाची राणी.
नको करू मैत्री आसवांशी
नको घेऊ मनावर भाषा लोकांची ..
ती आहेच अनोळखी ..
ये सखी तू जवळी ..
नको रडू ग अशी ..
नाही दिसत शोभून तू .
हास्य बनले खास तुझ्यासाठी ...
अन् तू माझ्यासाठी ..
ये जाणं जराशी ..
आणि ये जवळी अशी ...
असं म्हणत तिला तो आपल्या जवळ घेतो आणि एक घट्ट मिठी मारतो . आणि ती ही हसते . " नेहमी सारखं मनवलस ना तू ...पण कधीच नाही येणार का रे माझे आई वडील आपल्या गावी आपल्या घरी "
" येतील ग ...डोन्ट वरी ..." विशाल ..
" कधी ? " नीलिमा
" आपल्याला मुल बाळ झाल्यावर नक्की येतील "😜😜😂😂
" काय रे तू पण " 😔😔 आणि ती त्याला घट्ट बिलगते .
" कसा ग ? " विशाल ..
" काय माहित " नीलिमा
" ओके मी झोपतो उद्या खूप महत्वाची मीटिंग आहे " अस म्हणून तो झोपायला जातो .
" Hmm good night" म्हणत ती त्याच्या कपाळावर किस करते .
दूर देशी सासर माझ ..
माहेर दुरावल ..
जरी दुरावल माहेर .
लाखात एक भेटलं सासर ..
नवरा नसेल कोणाचा ..
जगात असा
एवढा खास ..
आयुष्य मनासारखं आहे . फुल कमी आहेत बागेत . पण त्या फुलांचा सुगंध मात्र खूप सुंदर आहे . कधीच न विरनारा आहे . तोच सुंगध घेते जरासा तेवढाच आयुष्याला दिलासा .. तस ही माझ आयुष्य खूप खास आहे .
असे शब्द ती तिच्या डायरीत लिहून झोपायला जाते .
लेक आई वडीलांपासून किती दूर आहे ..ह्या पेक्षा ती एवढ्या दूर असून ही किती खुश आहे . ह्याचा ही आता आई वडिलांनी विचार करायला हवा . आपण ज्या भागात राहतो . त्याच भागात आपली मुलगी आपण द्यायला हवी . हा हट्टाहास मुळात चुकीचाच . तो जरा बदलायला हवा .
काळ खूप पुढे चालला आहे. त्या बरोबर आपण ही जायला हवं . आपले आचार - विचार ही जायला हवे .
असं मला तरी वाटत . असो ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
ह्याची वाचकांनी पुन्हा नोंद घ्यावी ..
🌹🌹🌹🌹Thankyou so much aii of you! 🙏🙏🙏🙏
👍
ReplyDelete