जन्म दिलास तू ..
ऋणी मी ग !
आई तू ..
लेक मी ग !
वाटते तू मजला सखी माझी ...
मी ग छकुली तुझी ..
पदर तुझा धरून फिरते ..
आई म्हणुनी हाक मारते ..
वचन एकच मागते ...
आई तू तुझ्या गर्भात माझ्या नावाचे ..
शतदा बीज रुजव ग !
लेक तुझी होण्याचे भाग्य मजला दे ग !!
जन्म दिलास ..प्रेम ही दिलं ग !
माया दिली ममता ही दिली ग !!
साद घातली , साथ दिली ग !
आता एकच बाकी ..
शतदा जन्म देण्याचे वचन ग !
ते ही दे ग आई !!
ते ही दे ग आई !!
खूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे
ReplyDeleteअप्रतिम...👌
ReplyDeleteछानच भावना व्यक्त केल्या..👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏