नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 18, 2022

आज बरसून यावे आभाळ सारे

आज बरसून यावे आभाळ सारे ..
अलगद मिठीत शिरावे अल्लड वारे.
एक व्हावे आकाशातील चंद्र तारे .
आज बरसून यावे आभाळ सारे ..

मुक्या पिल्लांना कुशीत घ्यावे . 
दुःख त्यांचे ही जरा जाणून घ्यावे .
अश्रू डोळ्यांच्या कड्यावर थांबावे 
आयुष्य प्रवास सुखाचा ...
फक्त आपण चालत रहावे ..

आज बरसून यावे आभाळ सारे..
चला शोधू जरा आनंदाचे किनारे .
त्या मेघवनावर फुलले पिसारे ..
उडणाऱ्या थव्याला मी विनविते थांब ना रे ..

आज बरसून यावे आभाळ सारे ..
आनंदाचे बीज जमिनीत रुजावे .
त्यातून ईवलुसे रोपटे उमलावे ..
कल्पवृक्षा समान त्याचे तत्व असावे ..
आज बरसून यावे आभाळ सारे . 

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...