आज मी एक छान लेख लिहिनार आहे ..
' एवढंच का तिच्या जन्माच रहस्य ' शीर्षकावरून लेखाचा विषय लक्षात आलाच असेल ...
तिच्या मुळे घराचं गोकुळ होतं .
अंगणी पडलेलं तिचं पहिलं पाऊल ..
लक्ष्मीचं रूप भासतं ...
तरीही तिचं जगणं दुसऱ्यावर ओझच असतं ..
हो ओझचं असतं ...
मी स्वतः नाही म्हणत माझे स्वतःचे अनुभव हे वाक्य बोलत आहे . आणि आसपासची परिस्थिती मला हे वाक्य बोलायला भाग पाडत आहे .
आई वडील माझे असो , किंवा इतर कोणाचेही ..मुलीला जन्म देताना ती आपल्यावर कायम स्वरुपी ओझ असेल , हा विचार मनातून काढून टाकून जन्म द्यायला हवा .
ती नाही म्हणत कधी मला जन्म द्या . हे जग बघू द्या . ह्याचा एकमेव पुरावा म्हणजे स्त्री - भ्रूण हत्या . केलीच होती ना तिने सहन ..
ती ओझ नसतेच वो घराचं .
दिल जर तिला शिक्षण तिच्या हक्काचं
मैत्री सारखा तिच्याशी व्यवहार करा ..
ती डोक्यावरच ओझ हा विचारच मनातून काढून टाका .
एक पाऊल प्रगतीच्या दिशेने टाकुया ..
मुलीला सक्षम करण्याचं ध्येय बाळगुया ..
लग्न करून ती कधीच सक्षम होतं नाही ..
होते ती फक्त एक गुलाम ..हे का कळत नाही ..
मुलीला लग्न करून सासरी पाठवण्याच स्वप्न बघणाऱ्या आई वडीलांपेक्षा मुलीला सक्षम करण्याचं स्वप्न बघणारे आई वडील खरच ग्रेट आहे ..
लग्न करून ती सुखी होते ..हा फक्त आभास आहे . डोक्यावरचं ओझ खाली होतं . हा विचारच मृगजळ समान आहे . नाही होतं ओझ खाली उलट जबाबदाऱ्या वाढतात . पण शोकांतिका वाढलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आई वडील नेहमीच जागरूक असतात
पण मुलीचं , शिकून सवरून स्वतः च्या पायावर उभी राहण्याच स्वप्न मात्र अर्ध्यावरच सोडतात .
शोधातात आपल्या घराला शोभेल असा जावई ....लग्न करून पाठवून देतात . सासरी . पुढे जाऊन मुलगा चांगला शोधलेला असताना ही वाया गेलेला निघाला की , मुलीला उंबरठयावर सुद्धा उभी करत नाही . जशी आली तशी तिला सासरी वाटी लावतात..........
पाठवणी केल्यानंतर ती फक्त चार दिवसाची पाहुणी असेच तिला संबोधतात . तिला चार दिवसाची पाहुणी संबोधण्याधी तिला सक्षम करण्याचं का ते विसरतात ?
ती फक्त ओझ चार दिवसांची पाहुणी ह्या शब्दापूर्तीच का मर्यादित ...
मुलीला सक्षम करण्याचं ध्येय ठेवा .....
ना की लग्न करून सासरी पाठवण्याच ..
लग्न ही गरज नाही हे तिची ..
सक्षमीकरण ही प्रथम गरज.
लग्न ही फक्त एक परंपरा ,
पूर्वीपासून आज पर्यंत चालत आलेली ..
आणि आजपासून पुढचे कित्येक वर्षे ..
ती परंपरा चालूच राहणार.
दुर्गा मते
अतिशय परखड असे विचार मांडले शोना अगदी समाजाला जागृत करणारे विचार आहेत. पण... दुर्दैव एवढंच आहे की कितीही काही लिहिलं तरी समाज सुधारायचं नाव घेतच नाही. आज जग जरी प्रगत झालं असेल आधुनिक सुविधा सगळे सगळे आले असेल पण मात्र काही विषय आजही तसेच राहिलेले आहेत त्यात जराही बदल झालेला नाहीये पण बघुयात कदाचित आपण साहित्यिक लोकांची लेखणीच काही करू शकेल ह्या आशेवर नक्कीच राहूया आणि विशेष म्हणजे तू हा विषय घेतला, लिहिलास यातून तु जे उत्तम विचार मांडले, हवी तशी प्रेरणा
ReplyDeleteदिली आणि हवं तिथे काही जाब विचारले ग्रेटच 👍 एवढ्याशा वयात तू एवढं उत्तम दर्जाचे लिखाण करते 😊 खरोखर खूपच कौतुकास्पद आहे कायम अशीच लिहित राहा आणि खूप खूप प्रगती कर. बाप्पांचे आणि माझे आशीर्वाद तसेच शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी राहतील 👍😊 तुझ्या प्रत्येक लिखाणासाठी✍️✍️ मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🤗🤗🤗👌👌👌👌👌✍️✍️✍️✍️✍️👍👍👍👍