नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 19, 2022

स्वराज्याचा शिल्पकार

तिसरी भव्य काव्य स्तरीय स्पर्धा ..
स्पर्धेसाठी ..
विषय - स्वराज्याचे  शिल्पकार
शिर्षक - स्वराज्य रक्षक

शिल्पकार तू ह्या स्वराज्याचा 
अभिमान तू ह्या महाराष्ट्राचा ..
जाणता राजा तू ह्या सह्याद्रीचा ..
सोहळा रंगे आज ह्या मातीत तुझ्या जन्माचा ...

शिवनेरी वर शिवबा जन्मला 
जणू स्वराज्य पुत्र जन्मला ..
नव उमेदीचा सुर्य उगवला ..
तोच ह्या स्वराज्याचा शिल्पकार झाला ..

आदर्श ठेवून डोळ्यासमोर घडावी नवी पिढी ,
नको विचारात अंध श्रध्देची बेडी ..
संपवेल ती जगण्याची गोडी ..
नकोच आता डिजिटल विचारांमध्ये अंध श्रद्धेची खोडी ..

स्वराज्याचा शिल्पकार तो जाणता राजा ..
शिवबा माझा - शिवबा माझा ..
करू एक मुखाने गर्जना ..
स्वराज्य रक्षक 
शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय हो !!

दुर्गा राजु मते 
औरंगाबाद

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...