नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 18, 2022

सांग ना रे देवा

लागले डोहाळे आयुष्याला ह्या दुःखाचे ..
सरले दिवस सुखाचे ....
आले बरसून मेघ आसवांचे ..
कसे झेलू मी ते ओंजळीत ..
सांग ना रे देवा !

निस्तेज झाले जीवन ...
वाटू लागले जवळ यावे मरण ..

बांध फुटला दुःखाला ...

कसा आवर घालू ह्या मनाला ..
सांग ना रे देवा मला ..

शोभा गेली जगण्याची ...
करपली बाग ह्या सुखी संसाराची ...
दृष्ट लागली कुणाची ?
कळेना काही रे देवा !
सांग ना रे तूच देवा .

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...