गा ग आई तू एक अंगाई .
ओत तिच्यात माया आणि ममता ..
तुझ्या हृदयातील ..
ऐकू दे बोल तुझे प्रेमाचे ...
कान आसुसले तुझ्या लेकराचे
आज ऐकू दे सुर तुझ्या अंगाई चे ..
चिव चिव रोज ऐकते त्या खोप्यातली ..
नाही सय त्याला तुझ्या गोड अंगाईची ..
गा ग अंगाई तुझ्या लेकरासाठी ..
अबोल बोल तुझे रोज झोजवते ..
आज त्या शब्दाना मी विनविते ...
बोलके होण्यास भाग पाडते ..
गा ग आई एक अंगाई ..
तुझ्या लेकरासाठी ..
अप्रतिम ...!👌
ReplyDeleteखूपच छान....!👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏