मंद मंद हा गार वारा ..
मनाला हळूच स्पर्शून जाणारा ..
तिन्ही सांजेला भावनांचा गोठला किनारा !
कातर वेळी ह्या जीव होई बावरा !!
अंबर सजले लाल - केशरी रंगाने .
निशब्द मी गतकालीन आठवणीने!
टपोरे आसवे गाळत हसत मुखाने ..
संवाद साधू लागले मुक शब्दाने !!
नदी तीरावर एकटक पाहत बसले ..
जीवा- भावाचे क्षण आठवले ..
वाळूचे घर प्रेमाने बांधलेले ..
कित्येक स्वप्न त्यात सजलेले ..
हळुवार स्वप्न ही विरली ,
प्रीत ही लयास गेली !
का कुणास ठाऊक आज आठवली ..
प्रेम कहाणी त्याची - माझी ह्या कातरवेळी !!
निशब्द भावना ह्या कातरवेळी सजल्या ..
साठवणीतल्या पाऊलखुणा आठवल्या ..
काळजात होत्या जपलेल्या .
आज रचनेत उतरवल्या ..
दुर्गा मते
अप्रतिम दुर्गा
ReplyDeleteखूप हृदयस्पर्शी.!!
ReplyDeleteआबा
🙏