मिठी तुझी हवी हवीशी वाटते .
चिंता मनाची त्यात विसावी वाटते ..
मिठी तुझी आठवण पहिल्या प्रेमाची देते ..
रात्र मिलनाची नजरेत पडते ..
उब त्यात निस्वार्थ प्रेमाची ..
सुख दुःख व्यक्त करण्यासाठी वाटते ती हक्काची .
जशी गरज तुझ्या सहवासाची
तशीच गरज तुझ्या प्रेमळ मीठीची ..
हास्य अनावर होते माझे ..
अना वर हास्य ते जणू स्वप्न तुझे ..
मी तुझ्या मिठीत बघते ..
सुखद क्षण वेळोवेळी अनुभवते ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.