तुझ्यासारखी आई ..
मला मिळणार नाही .
जन्मो जन्मी तूच हवी मला आई ..
कुशीत घेऊन लाड करणारी .
चूक होता माझी गालातल्या गालात हसणारी ..
जन्मो जन्मी तूच हवी मला आई ..
चिऊ ताई च्या गोष्टी सांगणारी ..
भूक लागता प्रेमाने घास भरवणारी .
जन्मो जन्मी तूच हवी मला आई ..
माझ्यासाठी अंगाई गाणारी ..
साऱ्या जगाशी माझ्यासाठी भांडणारी ..
जन्मो जन्मी तूच हवी मला आई ..
पदर तुझ्या मायेचा डोईवर धरणारी ..
लाड मनाचे हट्टाने पुरवणारी ..
जन्मो जन्मी तूच हवी मला आई ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.