नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 7, 2022

गुलाब जुना ..

तो जुना गुलाब ...
अजुनही आठवतो मला तू दिलेला ,
आसमंत सारा पहिल्या भेटीत गहिवरलेला ..

धुके प्रेमाचे दाट तुझ्या डोळ्यात पसरलेले ,
त्या गुलाबाने मला तुझ्यासाठी वेडे केलेले ..

तो गुलाब आज ही बघते मी ..
त्याच्या हळुवार येणाऱ्या सुंगधात ,
 अजुनही तुला आठवते मी ..

वहीच्या पानात दडवून ठेवलेला ..
क्षण गोड त्यात आजही आहे साठवलेला ..

गुलाब तो जुना पहिला तूच दिलेला ..
त्यामुळेच मला प्रेम महिमा कळ लेला .
अजुनही आठवतो मला ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...