ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे ...कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .
सुटता सुटेना ...
प्रेमळ नाते हे ,
तुटता तुटेना ...
अनोखे प्रेम हे ,
बहरते नव्याने ...
त्याच्याशी रोज नाते जोडते ,
स्वाभिमानाने ....
पुन्हा पुन्हा हरवून जाते ,
त्याच्या मनात नव्याने अंकुरते ...
प्रेम बंधन हे ,
नव्याने जन्मास येते ...
ही लव्हस्टोरी आहे त्या दोघांची जे ना कधी भेटले , ना कधी ओळखीचे होते . तरीही एक दुसऱ्याच्या मनात कायमचे घर करून राहिले होते .
राहुल आणि नित्याची ...
काहीही झालं तरी जिवापाड मैत्री जपणार शेवटच्या श्वासापर्यंत अशी कमिटमेंट होती. त्यांच्या नात्याची
ती कमिटमेंट त्यांनी पुरेपूर पाळली .. लग्न झालं मुलबाळ झालं तरी त्यांची मैत्री नाही तुटली ..जस जस वय वाढलं तस तसं त्याचं प्रेम अधिकच बहरत गेलं ...
ह्या जन्मी अर्ध्यावर राहिलेली स्वप्न पुढच्या जन्मी नक्की पूर्ण करणार ...ह्या छोट्या समजुतीने त्यांना एकमेकांशिवाय जगायला शिकवलेलं .
नातं ते नव्याने बहरल ,
त्याच्या माझ्या मैत्रीचं ,
अनोळखी त्या नव्या प्रेमाचं ..
ओळखीच्या नव्या वळणावर भेटलेल
माझं मन त्याच्यासाठी उदार झालेलं ,
ह्या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी मात्र ,
नक्की त्याचीच होणार हे स्वप्न पाहिलेलं ..
किती माझं भाग्य ,
त्याच्या नशिबात नसताना सुद्धा ,
त्याचा मनात आजही जिवंत आहे ...
त्याच्या श्वासा श्वासात माझच नावं ,
गुणगुणत आहे ...
त्याचा माझा आनंद एक ,
अस्तित्व एक ,
श्वास एक ,
स्वप्न एक ...
एवढंच काय भावनांनी ओतप्रेत भरलेलं मन ही एक ...
तर मग बघुया नित्या आणि राहुल ची लव्हस्टोरी ..आवडेल ना तुम्हाला नित्या आणि राहुलच्या नात्याचा प्रवास माझ्या बरोबरच एन्जॉय करायला ...
कथा काल्पनिक नाही वाटत वास्तविक स्थिति दर्शवली आहे.
ReplyDeleteसुंदर लिखाण नित्या
ReplyDeleteसुंदर सुरुवात...पण कल्पना की वास्तव...??
ReplyDeleteछान लीहीलय...👌👍💐🍫