गुलाबाला गुलाब देताना ..
हलकेच मी लाजले ..
भुरभुर उडनारे केस
अलगद तू सावरले ..
ओंठावरील लाली फिकी पडली ,
जेव्हा नजर तुझी नजरेस भिडली ..
स्पंदन ही गोठली ..
अलगद प्रीत ही बहरली ..
अबोल शब्दात भाव तू ओतले .
पाहून ह्या प्रितीचे सोहळे ..
आकाशातील तारांकाना नववधू वाटले .
तुझे माझे नाते जणू सत्यात उतरले .
गुलाबाला गुलाब देताना ..
वचन ही दिले ..
वचन पूर्ण करण्याचे शब्द ही मागितले .
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.