नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 8, 2022

साथ देशील का

हृदय दिलं तुला साथ तू देशील का ?
रिकामा राहिलेला एक कोपरा मनाचा ..
प्रेमाने तो तू भरशील का ?
माझ्यासाठी जगण्याचं स्वप्न तू बघशील का ?

अपूर्ण आयुष्याला माझ्या ..
गरज प्रेमाची तुझ्या ..
ते प्रेम तू मजला देशील का ?
सांग ना सखे साथ तू मजला देशील का ?

तुझ्यासाठी थांबलो मी ह्या वाटेवरी ..
परतून माझ्यासाठी येशील का तू माघारी ..
साथ द्यायची तुला मला सांगशील तू तुझ्या घरी ..
सांग सखे मजला ..साथ तू देशील का ? 
तुझ्या मनाचा एक कप्पा माझ्या नावे करशील का ?
सांग सखे मजला तू साथ देशील का 
दुर्गा मते


2 comments:

  1. खुप सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...