नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 8, 2022

प्रेम बंधन भाग 23


नित्याने राहुल पुण्यात शिफ्ट होतोय ही न्यूज सांगितली होती . आता बघुया पुढे . 


सकाळी सकाळी अचानक नित्याच्या फोनची रिंग टोन वाजली . एवढ्या सकाळी कोणाचा असेल मे बी कंपनीचा असेल अस म्हणत ती तशीच पडून राहिली.  पण पुन्हा पुन्हा रिंग टोन वाजली .

शेवटी शेखर च तिला म्हणाला , " अग बघ ना कोणाचा कॉल आहे तो " 

" अहो कंपनीचा असेल एवढ्या सकाळी कोणाचा कॉल येईल मला .." अस म्हणत ती तशीच निपचित पडून राहिली . शेवटी शेखर ने जाऊन कॉल रिसिव्ह केला .
एवढ्या सकाळी राहुल ने का कॉल केला असेल असा विचार करून तो त्याला रिटर्न कॉल करणार तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी बेल वाजवत होत . मग शेखर ने कॉल न लावता . डायरेक्ट दरवाजा ओपन केला . बघतो तर काय राहुल आणि रिदिमा ..तो शॉक झाला .

" राहुल तू एवढ्या सकाळी इथे काय करतोस " शेखरणे विचारल .

" मी शिफ्ट होतोय ..इथे ह्याचं सोसायटीत समोरच्या बंगल्यात " राहुल बोलला 

" हो ते माहितेय मला नित्या बोलली काल रात्री पण कधी होणार हे नव्हत सांगितल .." शेखर 

" हो ते मीच नव्हत सांगितल तिला ..बाय दवे तू आम्हाला इथेच बाहेरचं ठेवणार आहेस . का ? की आत मध्ये ही बोलवणार आहेस " राहुल म्हणाला .

" Ohh स्वारी ..बोलण्या बोलण्याच्या नादात लक्षात नाही राहील . प्लीज ह्या ना आत मध्ये .." अस म्हणत शेखरणे दोघांनाही वेल कम केलं त्या दोघांना गेस्ट रूम मध्ये जाऊन फ्रेश व्हायला सांगितल . आणि किचन मध्ये जाऊन त्याने स्वतः हा चहा ठेवला . ते दोघेही फ्रेश होऊन हॉल मध्ये आले ..

" नित्या अग बघ तरी कोण आलय ते .." अस म्हणत शेखरणे तिला आवाज दिला . एवढ्या सकाळी कोण आलं असेल आता नित्या बघायला बाहेर गेली . 
ती त्या दोघांना बघून शॉक झाली.  

" तुम्ही एवढ्या सकाळी इथे माझ्या घरी " अस विचारत तिनेही टेबलावर असलेला चहाचा एक कप उचलला .

" हो अग आजच शिफ्ट व्हायचं ठरलेलं . दोन दिवस मी फ्री आहे . शूटिंग नाही तो पर्यंत आवरा आवर करायला सोप जाईल . " रिदिमा म्हणाली . 

" ओके ..तुम्ही आवरा आवर करा आणि जेवायला माझ्याकडे ह्या ." नित्या म्हणाली ..

" हो त्यासाठीच तर आताच इथे येऊन बसलो " राहुल ने मध्येचं जोक केला . त्याच्या बोलण्यावर सगळेच हसले.

थोडा वेळ त्यांनी बऱ्याच गप्पा मारल्या . नित्याने पण चहा नाश्ता केला . ते दोघे ही आणि  शेखर आणि नित्या पण समोरच घर बघायला गेले होते. ते घर तर सर्वानाच खूप आवडल . अगदी एकमेकांच्या घरासमोर . ह्याच्या बेड रूम ची बाल्कनी आणि त्यांच्या बेड रुम ची बाल्कनी अगदी नजदीक त्या बाल्कनीतून सहज ह्या बाल्कनीतल सार दिसायचं . खूप छान घर त्यांना मिळालं होत. त्यामुळे राहुल आणि रिदिमा दोघेही खूप खुश होते .

" बर शेखर आपण निघुयात का ? तुम्हाला पण जायचं आहे ना ड्युटीवर आणि मी आपल्या सर्वांसाठी छान जेवण बनवते . तुम्ही करा आवरा आवर आणि दुपारी या , तिकडे जेवायला " नित्या म्हणाली ..तिला रिस्पॉन्स देत शेखर ही म्हणाला .." हो खरच निघतो आम्ही मला जायचं आहे . " ते दोघेही जातात ..

नित्या शेखरला त्याचा  टिफीन करून देते.  तो ड्युटीवर जातो . आणि ती पण आधी कपडे वैगरे वॉशिंग मशीन ला लावते.  ते कपडे कमी असल्यामुळे ते वाळू घालण्यासाठी ती तिच्याच बेडरूम च्या बाल्कनी मध्ये जाते . ती कपडे वाळू घालत असताना सहज तिची नजर राहुल च्या घरात गेली . ते दोघेही खूप मजा करत होते.  
मोठं मोठ्याने हसत होते . तिला त्यांचं ते लाईफ बघून खूप आनंद झाला . कारण आज पर्यंत तिने आणि शेखरणे खूप जास्त वेळ सोबत घालवलेलाच नव्हता . तो समजूतदार होता.  पण परिपूर्ण नव्हता.  काम एके काम कामाशिवाय दुसर काहीचं महत्वाचं नाही . साधा नित्या चा birthday ही त्याच्या कधी लक्षात नव्हता . शेखर तिच्यासाठी खूप करायचा . पण खर प्रेम त्याचा वेळ तो तिला कधीचं देऊ शकला नाही.  ह्याच्या बाबतीत ती कम नशिबीच ....विचार करताना कधी हरवली ते तिला समजल नाही . तिचं मन खूप भरून आलं होतं . 
तेवढ्यात " छुक छुक " असा बारीक आवाज तिच्या कानावर पडला . तिने इकडे तिकडे बघितलं कोण नाही दिसल . भास झाला असेल मला अस म्हणत ती रूम मध्ये निघाली ..

परत जरा मोठ्याने आवाज आवाज आला ..
" ये , हॅलो इकडे बघ " राहुल

" राहुल " अस म्हणत तिने smile दिली . आणि पाठमोरी असलेली नित्या राहुल च्या बाल्कनी कडे बघायला लागली .. रिदिमा आत मध्ये तिच्या कामात गुंतलेली होती.  त्यामुळे तो बिनधास्त होता. 
हात वारे करत ते एकमेकांशी बोलत होते . हसत होते.  

" जेवण तयार झाले का ? " त्याने हातवारे करत विचारले ओंठाची हालचाल करत नित्या ने नाही बनवते आता रिदिमा येईल आत जा . असं बरच ती बोलली .
आणि आत मध्ये गेली . पण तो मात्र तिथेच उभा 
राहिला . आणि त्याने लगेच नित्या ला कॉल केला . तिने ही रिसिव्ह केला. 

" काय चालू आहे तुझ जा ना आत मध्ये रिदिमा ला मदत कर ना आणि मला ही जेवण बनवू दे परत तुलाच भूक लागेल " अस म्हणत ती हसली आणि लाजली ही 

" हो का मला भूक लागेल का ? आणि तुला ? " राहुल

" मला तर नेहमीच लागते ना राहुल " नित्या

" मी येऊ का मदतीला " राहुल.

" नको मी बनवते जेवण तू रिदिमा ला हेल्प कर " अस म्हणत तीने फोन लगेच कट केला .

तिने छान जेवण बनवल होतं . जेवण रेडी झाल्यावर तिने राहुल ला कॉल करून त्या दोघांना जेवायला बोलावलं .तिच्या हाताला उत्तम चव होती . जेवण खूप छान झालं होत.  रिदिमा तर खूप आवडल . ती जेवता जेवता .

" ये , खूप छान जेवण . मी एवढी पोटभर आज पहिल्यांदा जेवली ..मला तर काही बनवता येत नाही . आम्ही इथे शिफ्ट झाल्यानंतर तू आमच्यासाठी 
रोज डब्बा बन वशिल का म्हणजे मी तुला त्याचे पैसे पण देत जाईल . महिन्याचे .." ती काय बोलत होती . ते तिचं तिलाच कळत नव्हतं बहुदा . पण तीच बोलण नित्याच्या मनाला खूप लागलं . हे राहुल ला सहज कळलं . कारण रिदिमा च ते बोलण राहुल ला ही बिलकुल आवडल नव्हत. पण तो काहीच नाही बोलला आणि नित्या पण काहीच न बोलता जेवत होती . 

" अरे यार तुम्ही बोलत का नाही काही मी एकटीच बोलत आहे . आणि नित्या देशील ना ग आम्हाला दररोज डब्बा बनवून " ती परत म्हणाली

" ते बघू नंतर तू जेवून घे आधी . " राहुल जरा चिडल
 च त्याने लगेच हात धुतला..

" अरे एवढ्यात झालं तुझ घ्यायचं ना अजुन काही " नित्या म्हणाली 

" नाही झालं माझ मी जातो .." राहुल 

" अरे बस ना जरा वेळ " नित्या ने आग्रह केला 

" नको जातो मी आवरायचं आहे ना ग " अस म्हणत तो निघून गेला . आणि त्याच्या पाठो पाठ रिदिमा ही गेली . तिने सर्व आवरून ती पण आराम करायला बेड रुम मध्ये गेली .

क्रमशः ...
पुढील भाग लवकर


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...