" घरी गेल्यानंतर मला आठवणीने कॉल कर ."
आत्ता पुढे ..
राहुल कोल्हापूर मध्ये सकाळी सकाळी 4 साडे चार वाजता पोहोचतो . खूप थकलेला होता . पण नित्या कॉल कर अस बोललेली असल्या मुळे . त्याने फ्रेश वैगरे झाल्यानंतर लगेच तिला कॉल केला .
एवढ्या सकाळी कोणाचा कॉल आला असेल ती जराशी वेंधळली . कंपनीचा असेल असा विचार करून जागीच झोपली . पण परत मोबाईलची रिंग टोन वाजली . नाही कंप नीचा नसेल शेखर चा असेल परत येणार असतील ते . असं म्हणत ती लगेच उठली आणि कॉल रिसिव्ह केला .
आलेला नंबर पाहून " हे काय राहुल चा कॉल आणि एवढ्या सकाळी " ती त्याला म्हणाली .
" जस्ट पोहोचलो . फ्रेश झालो आणि आठवलं तू पोहोचल्यानंतर आठवणीने कॉल करायला सांगितलेला म्हणून केलेला नसेल आवडल तर , कट करतो . "
आणि तिचं काहीचं न ऐकता तो लगेच कॉल कट करतो .
" अरे ! चिडल की काय हा ..आपल बोलण न ऐकुन घेताच कॉल कट केला . असा कसा हा .."
ती त्याला कॉल करते . पण तो रिसिव्हचं करत नाही . शेवटी ही कॉल करण बंद करते .
तेवढ्यात त्याचा तिला मेसेज येतो . मी चिडलो नाही . पण खूप थकलोय आराम करायचा . दुपारी बोलू . त्याचा तो आलेला मेसेज बघून ती खुश होते .
ओके डिअर . असा ती त्याला रिप्लाय देते .
*******
ती पण झोपते तो पण झोपतो . नित्या एक टीच असल्यामुळे ती तिच्या मनची राणी होती . सकाळी 9 वाजता उठली . आणि मग हळू हळू आवरू लागली .
10 वाजता तिने तिच्यासाठी चहा केला . चहा वैगरे झाल्यानंतर निवांत बसली . काहीचं काम नव्हते मग करणार तरी काय ? तेवढ्यात कोणी तरी door bel वाजवली .
" कोण असेल ? " आणि ती दरवाजा ओपन करते . दरवाजावर उभा असलेला व्यक्ती बघून ती खूपच खुश होते.
" शेखर तुम्ही " अस म्हणत त्याला घट्ट मिठी मारते .
" कॉल नाही मेसेज नाही अस अचानक कस काय आलात आणि वेळे आधीच आलात .."
" जाऊ का परत रिटर्न ..नव्हतं यायला हवं का ? " तो म्हणाला .
ती त्याच्या बोलण्यावर हसली आणि लाजली ." म्हणजे तस नव्हत म्हणायचं . "
" मग कसं म्हणायचं होतं " शेखर ..
" कस नाही तुम्ही आत तर ह्या आधी दारात काय उभे राहिलात . "
" तूच उभ केलंस " शेखर .
" स्वारी चला ..तुम्ही फ्रेश होऊन या तो पर्यंत मी गरमा गरम चहा बनवते . आणि जेवणाची तयारी करते ."
" ओके चालेल " अस म्हणत तो फ्रेश व्हायला गेला . तिने पण छान चहा आणि नाश्ता बनवला . दोघांनी पण चहा ना श्ता केला .
" मी खूप बोर झालोय मी जरा आराम करतो . " असं म्हणत तो बेडरूम च्या दिशेने निघतो .
" ओके चालेल मी पण तो पर्यंत कपडे वॉशिंग मशिनला लावते . आणि दुपारचं जेवण बनवते . " ती म्हणाली.
" चालेल " तो झोपायला गेला .
तिने आधी कपडे वॉशिंग मशीन ला लावले आणि नंतर स्वयं पाक करण्यासाठी किचन मध्ये गेली .
कणीक भिजवून झाली होती . भाजीची तयारी करत असताना आला राहुल चा कॉल . तिने लगेच कॉल रिसिव्ह केला .
" झाली का झोप ? गेला का थकवा ? मूड फ्रेश ना .."
ती म्हणाली
" हो " राहुल
" मग बाकी काय ? " ती
" काय नाय आता ऑफिस मध्ये आलो. निवांत " राहुल .
" व्वा छान " नित्या
" तुझ काय चालू आहे " राहुल
" स्वयंपाक शेखर आला ना " नित्या
" हो का ..? " राहुल
" हो " नित्या ..
" बर कर मग स्वयंपाक मी आता जरा काम करतो . बोलू नंतर मी करेन कॉल " राहुल
" ओके बाय मिस यू सो मच " नित्या
" सेम टू यू " राहुल .
ती स्वयंपाक करते . ते दोघे पण जेवण करतात . शेखर तिला घडलेल्या साऱ्या गोष्टी सांगतो . आणि ती ही शेखर ला राहुल भेटायला आला होता . आणि तिच्या सोबत घडलेल्या बऱ्याच गोष्टी सांगते .
त्यांनी एकमेकांपासून काहीही लपवलं नाही . नित्याने आपल्यापासून राहुल हिला भेटायला आला ही गोष्ट लपवली नाही . म्हणजे हिच्या मनात पाप नाही . हे त्याला पटल . त्याला तिचा प्रामाणिक पणा खूपच आवडला .
जेवण झाल्यावर ते दोघेही झोपायला गेले . शेखर ने तिला पुढील शिक्षणा साठी एडमिशन पुणे युनिव्हर्सिटी मध्ये घे . असं सजेश केलं . तिने पण लॉ ला एडमिशन घ्यायचं ठरवलं . शेखर ला ही तिने घेतलेला निर्णय खूप आवडला ..
क्रमशः
पुढील भाग लवकर ..
No comments:
Post a Comment
Comments plz.