नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 2, 2022

एक बहिण हवी होती..

मला एक बहिण हवी होती .
सुख - दुःख वाटून घेण्यासाठी. 
भांडण करण्यासाठी ..
माझ्या मनातील गुपित तिच्या मनात रुजवण्यासाठी ..
मला एक बहिण हवी होती .

छोटी मोठी कशीही चालली असती ..

दुर्गा म्हणून हाक मारणारी जास्त आवडली असती ,
ताई म्हणून हाक मारणारी ही आवडली असती .
खरच मला एक बहिण हवी होती ..


मला खूप वाईट वाटत ..

बहिण नाही ह्या गोष्टीचं

खरच देवाने एक बहिण द्यायला हवी ..

खोटं खोटं रुसणारी , गोड गोड बोलणारी .

ताई म्हणून हाक मारणारी .

मला एक बहिण हवी होती


मी रडत असताना अलगद जवळ येऊन

डोळे पुसत काय झालं ग ?

म्हणत डोळे पुसनारी .

आनंदाने एक मिठी देणारी ..

खरच देवाने मला एक बहिण द्यायला हवी होती .




1 comment:

  1. खूप सुंदर रचना,खरेच आहे

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...